वेध माझा ऑनलाइन - सगळे मोदी नावाचे चोर का असतात असा सवाल करणाऱ्या राहुल गांधींना नुकतीच 2 वर्षाची शिक्षा झाली आहे तसेच त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्याने समस्त ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत हा समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे बाहेरच्या देशात जाऊन ते भारताची बदनामी करत आहेत एकूणच या सगळ्या कारणाने आज कराड येथील दत्त चौकात भाजप ओबीसी समाजाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले तसेच त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या त्यांचा निषेधही यावेळी ओबीसी समाजाने केला
यावेळी भाजप ओबीसी समाजाचे सर्व पदाधिकारी महिला तसेच शहर व तालुका स्तरावरील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
No comments:
Post a Comment