वेध माझा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचं निधन झालं आहे. त्यांच्यावर वरळी येथे अंत्यसंस्कार केलं जाणार आहे.माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांचं आज सकाळी साडे आठच्या सुमारास निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दोन दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनातून इंडस्ट्री अजूनही सावरलेली नाहीय. दरम्यान आता आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.आईच्या जाण्याने माधुरी दीक्षित आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माधुरी दीक्षित आपल्या आईच्या अतिशय जवळ होती. माधुरी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी आईसोबत शेअर करत असे. या वयातही स्नेहलता नेहमीच हसतमुख चेहऱ्याने आपल्या लेकीसोबत प्रत्येक फोटोत दिसून येत होत्या.
No comments:
Post a Comment