Tuesday, March 14, 2023

उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली ; याचिकाकर्त्या गौरी भिडेंना २५ हजार रुपयांचा ठोठावला दंड ;

वेध माझा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी दाखल याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना कोर्टाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी  यासाठी गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. भिडे यांची ही याची उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप गौरी भिडे यांनी करत ही याचिका दाखल केली आहे.


No comments:

Post a Comment