कराडमध्ये मुजावर कॉलनी येथे पिण्याच्या पाण्यात तेथील ड्रेनेज चे पाणी मिसळत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले आहे त्याविषयी तक्रार करूनही पालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्याची सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांची तक्रार आहे शहरात रस्त्याची कामे किंवा ड्रेनेज ची कामे सुरू असतात त्यादरम्यान रस्ता खुदाई करताना काही लिकेजेस राहून असे प्रॉब्लेम होत असतात मात्र लोकांच्या आरोग्याचा विचार करून ते तात्काळ सोडवणे तितकेच गरजेचे असते नाहीतर कावीळ, कॉलरा तसेच वेगवेगळी इन्फेक्शन्स होण्याची व त्यातून अनेक आजार बळावण्याची शक्यता असते मुजावर कोलनीत बरेच दिवस हा प्रॉब्लेम सुरू आहे तरीही पालिका याकडे सपशेल दिर्लक्ष करतेय ही बाब गंभीर आहे... यामुळे भविष्यात त्याठिकाणी काही आरोग्याच्या समस्या वाढल्या तर त्याची जबाबदारी हे अधिकारी घेणार का? असा प्रश्न आहेच... म्हणून त्याठिकाणी जबाबदारीने काम होणे अपेक्षित असतानाही ते होताना दिसत नाही...
दरम्यान, त्याठिकाणी गटार,नाल्याची तर व्यवस्था दिसतच नाही आणि जेथे ही व्यवस्था आहे तिथे नाले तुंबलेल्या अवस्थेत दिसतायत, त्यामुळे पाणी जाण्याला अजिबातच जागा नाहीये... तर दुसरीकडे तेथे पालिकेने काढलेल्या खड्यात ड्रेनेज युक्त पांढऱ्या रंगाचे पाणी निदर्शनास आले... अगदी तसेच पिण्यासाठी त्या परिसरात पाणी येत असते असे त्याठिकाणच्या रहिवाशयांनी सांगितले.. ते लोक म्हणाले...आम्ही येणारे पाणी पहिल्यांदा बराच वेळ तसेच सोडुन देतो...त्यानंतर काही कालावधीने पिण्यासाठी ते भरतो...तरी त्या पाण्याला वास येत असतो...उकळून पिण्यासाठी देखील हे पाणी योग्य वाटत नाही...पण आम्हाला पर्याय नाही...अशी अजून काही दिवस परिस्थिती राहिली तर त्याठिकाणी विविध आजार सुरू होतील की काय... अशी भीती त्याठिकाणी व्यक्त होऊ लागली आहे...
त्या ठिकाणी काढलेले खड्डे रस्त्यापासून अंदाजे तीन फूट खोल आहेत... त्या खड्यात लहान तोंडाची पाण्याची लाईन आहे त्यामुळे खड्डे काढूनही लिकेज लवकर सापडेल अशी त्याठिकाणी परिस्थिती नाही, तरीही पालिकेचे अधिकारी लवकरच लिकेज प्रॉब्लेम सुटेल असे म्हणत आहेत...मात्र एवढ्या खाली पाण्याची लाईन बसावण्यापेक्षा अजून फूटभर वर घेऊन व त्याठिकाणी मोठ्या तोंडाची नवीन पाईप लाईन बसवल्यास त्याठिकाणचा हा प्रॉब्लेम सुटू शकतो असे तज्ञांचे मत आहे...मात्र गेली वर्षभर हा प्रॉब्लेम पालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या गतकाळ कारभारामुळे तसाच प्रलंबित राहिला आहे... त्याठिकाणचा हा प्रॉब्लेम माणसांच्या आयुष्याशी खेळणारा आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तेथे टँकर ने पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी होत आहे
No comments:
Post a Comment