Tuesday, March 7, 2023

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्यांसाठी ५ कोटी २१ लाखाचा निधी

वेध माझा ऑनलाईन - 
माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मधील रस्त्यांची दर्जोन्नतीसाठी ५ कोटी २१ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राज्यात राबविली जाते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत सहभागी नसलेल्या आणि दुरावस्था झालेल्या रस्त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्प्या टप्प्याने राज्यात राबविली जाते. या अनुषंगाने कराड दक्षिण मतदारसंघातील रस्ता सुधारणेसाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ५ कोटी २१ लाख इतका निधी मंजूर झाला आहे व या निधीमधून दुरावस्था झालेल्या रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. 


मंजूर निधीच्या माध्यमातून गोंदी ते कणसे मळा शेणोली रस्ता साठी २८२.७१ लाख इतका तर चोरमारवाडी माटेकरवाडी रस्ता साठी २३८.३७ लाख असा एकूण ५ कोटी २१ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

No comments:

Post a Comment