कराडमध्ये मुजावर कॉलनी येथे पिण्याच्या पाण्यात तेथील ड्रेनेज चे पाणी मिसळत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले आहे त्याविषयी तक्रार करूनही पालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्याचीही संजय चव्हाण यांची तक्रार आहे शहरातील सोमवार पेठेत देखील अशाच प्रकारे पाण्याला वास येत असल्याच्या तक्रारी काही दिवसांपूर्वी होत्या
शहरात वारंवार रस्त्याची कामे किंवा ड्रेनेज ची कामे सुरू असतात त्यादरम्यान रस्ता खुदाई करताना काही लिकेजेस राहून असे प्रॉब्लेम होत असतात मात्र लोकांच्या आरोग्याचा विचार करून ते तात्काळ सोडवणे देखील तितकेच गरजेचे असते नाहीतर कावीळ, कॉलरा असे अनेक आजार बळावण्याची शक्यता असते मुजावर कोलनीत बरेच दिवस हा प्रॉब्लेम सुरू आहे असे समजते तरीही पालिका याकडे सपशेल दिर्लक्ष करतेय ही बाब गंभीर आहे यामुळे उद्या त्या वस्तीत काही आरोग्याच्या समस्या वाढल्या तर त्याची जबाबदारी हे अधिकारी घेणार का? असा प्रश्न आहेच म्हणून त्याठिकाणी जबाबदारीने काम होणे अपेक्षित असताना ते सध्या होताना दिसत नाही सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पेंढारकर यांनी याबाबत पालिकेचे संबंधित लोकांशी बोलून त्या ठिकाणी खड्डे काढून लवकरात लवकर लिकेज हुडकून काढा अशी विनंती केली आहे तर आपले कराड ग्रुपचे अडमीन संजय चव्हाण यांनी पालिकेचे संबंधित अधिकारी ए आर पवार व तेवरे यांना तक्रार करूनही ते या प्रश्नाकडे फारसे लक्ष देत नाहीत या कारणाने सातारा जिल्हाधिकारी याना ड्रेनेजचे हे मिक्स झालेले पाणी बाटलीत घेऊन आपले कराड ग्रुप च्या वतीने समक्ष उद्याच भेटणार आहेत असे स्वतः संजय चव्हाण म्हणाले आहेत..
खरतर पालिकेने आपले कर्तव्य म्हणून हा प्रश्न आपल्या धर्तीवर त्या-त्यावेळी सोडवणे गरजेचे असताना काही अधिकाऱ्यांच्या गतकाळ कारभारामुळे असे अनेक प्रश्न शहरात प्रलंबित राहताना दिसत आहेत आणि ही नामुष्कीजनक बाब असल्याची चर्चा त्यानिमित्ताने नेहमीच होत असते याप्रश्नी अशीच काहीशी सध्या परिस्थिती आहे
No comments:
Post a Comment