वेध माझा ऑनलाईन - राष्ट्रीय महामार्गावरील कराड व मलकापूर शहर हद्दीमधील नवीन पूल बांधणीसाठी जुना पूल पाडण्यात येत आहे. हे काम गेल्या महिनाभरापासून सुरु झालेले आहे. सद्या दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थिंचा विचार करून सकाळी 9 ते 11 असा 2 तासांचा रश अवर राबविला जाणार आहे. यादरम्यान हायवेवरील संपूर्ण अवजड वाहतूक थांबवली जाणार आहे. आ. चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार आज सकाळी पोलीस प्रशासनाने ट्रायल घेऊन तसा अहवाल आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केला. तसेच हॉटेल संगम समोरील पूल लवकरात लवकर जमीनदोस्त करून त्याठिकाणी रस्ता करून सर्कल केले जाणार आहे. या सर्कल मुळे ढेबेवाडी फाटा इकडचे काम सुरु झाल्यानंतरचा येणारा ताण कमी होणार आहे. अशा सर्व तातडीच्या उपाययोजना दहावी व बारावीच्या परीक्षार्थिंचा विचार करून केल्या जाणार आहेत यामुळे परीक्षार्थिंना दिलासा मिळणार आहे. अशा काही ट्राफिक नियंत्रण बाबतच्या सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कराड शहरातील हॉटेल संगम समोरील पूल जमीनदोस्त केल्यानंतर मलकापूर येथील दुहेरी उड्डाण पूल पाडण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या कंपनीने हाती घेतले असतानाच गेल्या आठवड्यात ३ मार्च रोजी मोठी वाहतूक कोंडी झाली होती यादरम्यान अनेक नागरिकांचे फोन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आले होते. त्यादिवशी आ. चव्हाण मुंबई येथे अधिवेशन मध्ये असल्याने त्यांनी तिथूनच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून वाहतूक कोंडीबाबत पूर्ण माहिती घेतली. व त्यानुसार तातडीने सूचना दिल्या यामुळे काही वेळातच वाहतूक कोंडी सुटली. पुलाचे काम सुरु झालेपासून दर महिन्याला आढावा बैठक घेतली जाणार असे मागील महिन्यात (७ फेब्रुवारी) घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आ. चव्हाण यांनी सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज (६ मार्च) रोजी हायवेच्या कामाबाबत दुसरी आढावा बैठक माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रणजीत पाटील, शहर पोलीस निरीक्षक बी आर पाटील, राष्ट्रीय महामार्ग काम करणारी कंत्राटी कंपनी डी पी जैन चे प्रोजेक्ट अधिकारी प्रदीप जैन, वाहतूक पोलीस शाखेच्या सरोजिनी पाटील, कराड व मलकापूर नगरपालिकेचे अधिकारी आदींच्यासह पीडब्लूडी चे अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक राजेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण, नितीन काशीद, अशोकराव पाटील, झाकीर पठाण, इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
अधिवेशनचा पहिला आठवडा संपल्यानंतर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये आल्यानंतर त्यांनी लगेचच राष्ट्रीय महामार्गा संदर्भात आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीत चार दिवसापूर्वी वाहतूक कोंडी कशामुळे झाली याचा आढावा घेऊन यापुढे अशी कोंडी होऊ नये यासाठी कॉन्ट्रॅक्टर कंपनी च्या योजना समजून घेतल्या. या कंपनीस वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना असल्याने ते त्यांच्या टार्गेट ने काम करीत आहेत परंतु त्याचबरोबर पूल बांधताना स्थानिक नागरिकांना समस्याना तोंड द्यावे लागत असल्याने त्या सोडविणे प्राधान्य आहे आणि यासाठीच आ. चव्हाण यांनी दहावी बारावी च्या परीक्षार्थिंचा विचार करून परीक्षा कालावधी मध्ये काही काळ जड वाहतूक बंद करावी. तसेच संगम पुलासमोरील पूल पूर्ण पडल्याने तिथे स्वच्छता करून तिथे सपाटीकरण करून रोड तयार केला जावा आणि तिथेच एक सर्कल करून ट्राफिक वळविले जावे. जोपर्यंत पुलाचे बांधकाम अंतिम टप्यात येत नाही तोपर्यंत हायवेवरील स्काय वॉक पाडले जाऊ नयेत अशाही सूचना यावेळी आ. चव्हाण यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच पोलीस विभागाशी ट्राफिक बाबत सविस्तर चर्चा करताना यामध्ये सद्याची वाहतूक सुरळीत जाण्यासाठी दोन्ही बाजूने किमान 2-2 लेन तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच पर्यायी मार्गाचे पर्याय सुद्धा यावेळी सुचविले गेले. याचसोबत या दोन्ही बाजूच्या लेनवर ब्रेक डाऊन क्रेन वापरली जाणार आहे जेणेकरून एखादे वाहन बंद पडले तर ते तात्काळ तिथून हलविले जाईल.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गावरील कराड व मलकापूर येथील दोन्ही पूल पूर्णपणे पाडून त्याजागी नवीन ६ लेन चे सिंगल पिलर उड्डाण पूल बांधले जाणार आहेत. या नवीन पुलाखाली ८ लेनचा सेवा रस्ता बनविला जाणार आहे. असा एकूण 14 लेन चा हा हायवे असणार आहे. महाराष्ट्रात सर्वात 1 नं चा असा उड्डाण पूल कराड मध्ये होणार आहे. सद्या या पुलाचे काम सुरु आहे. यामुळे या पुलाच्या कामादरम्यान थोडीशी गैरसोय होईल पण ती आम्ही ज्या त्या वेळी दुरुस्त करण्याचे प्रयत्न करीत आहोत. यासाठीच दर महिन्याला आढावा बैठक घेतली जाणार आहे. पण हे पुलाचे काम कराड व मलकापूर शहरासाठी अत्यंत महत्वाचे काम असणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरातील नागरिकांनाच याचा फायदा होणार आहे. यामुळे थोडासा ट्राफिक चा त्रास आपणास सहन करावा लागेल पण हे काम पूर्ण होण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे. प्रशासनाला सुद्धा सूचना दिल्या आहेत की नागरिकांच्या समस्याचे तातडीने व आपुलकीने निरसन कराव्यात तसेच हायवेचे काम करणाऱ्या डी पी जैन कंपनी ला नागरिकांच्या समस्यासाठी तक्रार केंद्र उभरायला सांगितले आहेत.त्यानुसार त्यांनी 2 तक्रार निवारण केंद्र उभारले आहेत. आणि जर यामध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण झाल्या तर अशा नागरिकांनी थेट मला संपर्क साधावा.
आढावा बैठकीनंतर आज सकाळी पोलीस प्रशासनकडून ट्रायल रन घेण्यात आला व यानुसार अवजड वाहतूक हायवेवर थांबवली गेली. 7 मिनिटे थांबिलेली अवजड वाहतूक जवळपास दीड किलोमीटर मागे लाईन गेली व जवळपास 60 वाहने थांबली होती पण त्या रश अवर नंतर ट्राफिक सोडले तर 5 च मिनिटात परिस्थिती सुरळीत झाली. यामुळे अवजड वाहतूक थांबवून ट्राफिक नियंत्रण केले जाऊ शकेल तसेच संध्याकाळी ऑफिस शाळा सुटल्यानंतर चा सुद्धा रश अवर विचारात घेऊन राबविला जाऊ शकेल. पूल पाडण्याच्या या संपूर्ण कामावर पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही च्या माध्यमातून लक्ष आहे तसेच यंत्रणा सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित आहे. यामुळे नागरिकांना प्राधान्य देऊनच काम प्रशासनाच्या देखरेखीखाली केले जाणार अशी माहिती कराड शहर पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment