वेध माझा ऑनलाईन - आज शंभूराज देसाई यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली त्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस शिवसेना नेते संजय राऊत हे सातारा सांगली कोल्हापूर दौऱ्यावर आहेत शिवगर्जना यात्रेतून ते लोकांशी संवाद साधत आहेत काल साताऱ्यात संजय राऊत आपल्या भाषणातून पालकमंत्री देसाई यांच्यावर तुटून पडले ते झोबल्यामुळे आज तातडीने फक्त...राऊत...हाच विषय डोक्यात ठेवून पालकमंत्र्यांनी आजची पत्रकार परिषद घेतली आणि राऊत याना साताऱ्यात येऊच दिले नाही पाहिजे असे वक्तव्य करून त्यांना राऊत यांच्या टीकेचा किती त्रास होतोय हे पत्रकारांना दाखवून दिले तरी नाईलाजाने कोणतेही स्टेटमेंट केल्यानंतर आम्ही राऊत यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही... असेही बोलताना ते दुसरीकडे दिसत होते...एकूणच यावेळी त्यांनी आपल्या सोयीची उत्तरे दिली...तर बाकीची उडवून लावत ही पत्रकार परिषद घेतली...यावेळी शिवसेना शहराध्यक्ष राजेंद्र माने व शिंदे गटाचे युवा नेते रणजित पाटील यांची उपस्थिती होती
दरम्यान मंत्री देसाई याना फक्त राऊत याच एका विषयावर पत्रकार छेडत होते... राऊत सोडून दुसरं काही नाही का रे ? असा सवाल मंत्री देसाई यांनी पत्रकारांना अखेर केलाच... त्यावेळी राऊत या विषयावर बोलताना मंत्री देसाई यांची झालेली दमछाक लपून राहिली नाही...
दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले... संजय राऊत यांनी चोर मंत्रीमंडळ असा उल्लेख विधिमंडळबद्दल बोलताना केला आहे त्याबद्दल त्यांच्यावर हक्कभंग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हक्कभंग समिती नियमानुसार स्थापन झाली आहे अधिवेशन संपेपर्यंत ही समिती त्यांच्याबद्दल योग्य निर्णय नक्की देईल असा आम्हाला विश्वास आहे...राऊत हे फक्त शिंदे गटाच्या 40 जणांना आपण चोर असे म्हटले असल्याचे सांगतात ...संपूर्ण विधिमंडळ सदस्यांना आपण बोललो नाही असे स्पष्टीकरण देतात असे पत्रकारांनी सांगितल्या नंतर मंत्री देसाई म्हणाले...ते जे काही म्हटले आहेत त्याचे रेकॉर्डिंग आहे ते पाहून खरे-खोटे समोर येईल...
शिवसेनेने देसाई याना आमदार केलंय या साताऱ्यात राऊत यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले...मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार मंत्री केले आहे ठाकरे फक्त आमचेच आहेत असे राऊत यांनी समजू नये मी 4 लाख लोकांमधून निवडून येतो त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे मगच माझ्या सारख्या लोकप्रतिनिधींच्या नादाला लागावे राऊत हे आमच्या मतावर खासदार झालेत त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा खासदार होऊन दाखवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना दिले
ते म्हणाले... आम्ही उद्धव साहेब असे अजूनही आदराने म्हणतो आदित्यजी असेही म्हणतो आम्ही नेहमी सभ्य आणि चांगल्या भाषेत बोलतो मात्र तेच आमच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात राऊत यांच्या नादाला अजूनही उद्धव ठाकरेंनी लागू नये 40 जण त्यांना कशामुळे सोडून गेले हे त्यांनी आतातरी लक्षात घेतले पाहिजे ... आम्हाला शिंदे साहेबांनी सक्त ताकीद केली आहे की तुम्ही उत्तर देताना सभ्य भाषेतच द्या असे देसाई म्हणाले...मात्र हे बोलताना काही दिवसांपूर्वीच चहापान कार्यक्रमावेळी विरोधकांना स्वतः मुख्यमंत्रीच देशद्रोही म्हणल्याचे मंत्री देसाई सोयीस्कर विसरले की काय ? अशी पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांच्यात चर्चा होती...
राऊत यानी छत्रपतींच्या वशजांचे पुरावे मागितले होते अशा राऊत याना साताऱ्यात येऊच दिले नाही पाहिजे असेही विधान मंत्री देसाई यांनी यावेळी आवेशात आणि भावनेच्या भरात केले...एकूणच संजय राऊत हे सध्या शिंदे गटाच्या 40 आमदारांचा चोर म्हणून उल्लेख करत आहेत त्यामुळे सर्वच शिंदे गट त्यांच्या वक्तव्याला उत्तर देताना घामाघूम होताना दिसतोय तीच गत मंत्री शंभूराज देसाई यांची झाली तर नाही ना? अशी चर्चा संजय राऊत सातारा जिल्ह्यात सभा व गाठीभेटी घेत असल्यापासून सुरू आहे
No comments:
Post a Comment