Tuesday, March 7, 2023

आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले... "ते' नगरसेवक संजय राऊत याना भेटले त्यात गैर काय ? राऊत हे आमच्या महाआघाडीचे नेते आहेत ;

वेध माझा ऑनलाईन - आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाचे कराडचे नगरसेवक इंद्रजित गुजर व अप्पा माने हे काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांना भेटले होते राऊत यानी गुजर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर  त्यांचे जंगी स्वागत या दोघांनी केले होते त्यानंतर कराडात आ पृथ्वीराज चव्हाण गटामध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली होती त्याविषयी आज पत्रकारांशी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले राऊत हे महाआघाडीचे नेते आहेत आम्ही महाआघाडी म्हणून एकत्रच आहोत आणि इथल्या कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली तर हरकत काय? ते महाआघाडीचे नेते आहेत त्यांना भेटले म्हणजे आमच्यात फूट पडली असे म्हणणे योग्य नाही असे म्हणत आमदार चव्हाण यांनी या झालेल्या भेटीला एकप्रकारे दुजोराच दिला आहे ? त्यामुळे होणाऱ्या कराड पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाला कराडात उभे करुन मजबूत महाआघाडी बनवण्याची खेळी खेळली जातेय का?  अशी शंका घ्यायला यानिमित्ताने वाव असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे

दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंद्रजित गुजर यांच्या निवासस्थानी भेट दिली मात्र त्यापूर्वी सेना नेते विनायक राऊत हे देखील इंद्रजित गुजर याना भेटले असल्याची बातमी होती शिवसेनेतून त्यांना ऑफर दिल्याचे वृत्त आहे स्वतः गुजर व त्यांच्याबरोबर असणारे शहरातील आजी माजी काही नगरसेवक ठाकरे सेनेत जाण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते शिवसेनेच्या कोणत्या पदासाठी गुजर यांच्यासह त्यांच्या समर्थकाना ऑफर दिली जाते आणि कोणत्या पदावर तडजोड होते हे बघून व त्यावर चर्चा होऊन मगच गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांचा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे त्यानंतर काही दिवसांनी होणाऱ्या कराड पालिका निवडणुकीसाठी बाबा गटाबरोबर महाआघाडीचे सदस्य म्हणून हेच नगरसेवक ठाकरे गटाच्या माध्यमातून पुन्हा बाबा गटाबरोबर हातात हात घालून एकत्र येत भाजप- शिंदे गटाशी दोन हात करण्यासाठी शहरात एकत्र दिसतील अशीही शक्यता यानिमित्ताने वर्तवली जात आहे 
सध्या महाआघाडीचा प्रयोग आत्तापर्यंतच्या निवडणुकांमधून यशस्वी झाल्याचे राज्यातले चित्र आहे कराड पालिकेसाठी देखील महाआघाडी होणार असे निश्चित मानले जात आहे त्यातच राऊत याना गुजर आणि अप्पा माने भेटले, तर त्यात गैर काय? असे म्हणत आमदार चव्हाण यांनी या भेटीला एकप्रकारे दुजोरा दिला आहे ? अशी चर्चा आहे त्यामुळे कराडात दोन काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेचे प्राबल्य कमी असल्याने ठाकरे गटाला कराडात उभे करुन महाआघाडीची ताकद वाढण्यासाठी नगरसेवक गुजर व माने यांचा ठाकरे गटात होणारा प्रवेश म्हणजे एक राजकीय खेळी आहे का ? अशी शंका घेण्यास यानिमित्ताने
 वाव असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे... पाहूया पुढे काय होतंय ते !

 

No comments:

Post a Comment