वेध माझा ऑनलाइन - पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये निवडणुकीत कसबा पेठमधून काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर तर पिंपरी चिंचवडमधून अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे.दरम्यान मतमोजणी पार पडल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते मिळाली तर नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली आहेत. 37व्या फेरीनंतर 36,091 मतांनी जगताप विजयी झाल्याचे घोषीत करण्यात आले.
चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. राहुल कलाटे यांनी तब्बल 44 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवल्याने याच मतांचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाल्याचे दिसून येत आहे.
या दोन्ही जागांसाठी रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली.
चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते.
No comments:
Post a Comment