Monday, January 10, 2022

एस टी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मुद्याबाबत काय म्हणाले पवार?

वेध माझा ऑनलाइन - एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका सरकारने सुद्धा स्पष्ट सांगितली की ते शक्य नाही आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे की कोर्टातून त्याबाबत समिती नेमून त्या समिती बाबतची भूमिका आम्ही मान्य करु असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे विलिनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही असं जेष्ठ नेते खासदार शरद पवारांनी स्पष्ट केलं. एसटी संप आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी आज खासदार शदर पवार, राज्याचे मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समिती यांच्यामध्ये बैठक झाली. त्यानंतर शरद पवार बोलत होते. 

एसटी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार शरद पवारांनी आज थेट भाष्य केलं. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "आपल्याला यावर राजकारण करायचे नाही. एसटीची बांधिलकी ही प्रवाशांशी आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही."
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली. 

No comments:

Post a Comment