वेध माझा ऑनलाइन - प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या त्या 92 वर्षांच्या आहेत.
लता मंगेशकर या देशातील गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रत्येक गाणी सदाबहार आहेत. त्यांना प्रत्येक गायक आपला आदर्श मानतो. आज त्या तब्बल 92 वर्षांच्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांचा जन्म इंदौरमध्ये झाला आहे. त्या दीनानाथ मंगेशकर यांच्या मोठ्या लेक आहेत.
लता मंगेशकर यांना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे. त्यांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयात आपल्या वडीलांकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. परंतु वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती
No comments:
Post a Comment