वेध माझा ऑनलाईन - भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पुढील चार दिवसात विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात येत्या काही दिवसात हलका ते मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांन यलो ॲलर्ट केला आहे.
नेमका पाऊस कुठं होणार?
उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणा जाणवणार असून येत्या चार दिवसात राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. 6 ते 9 जानेवारी दरम्यान विविध ठिकाणी पाऊस होणार आहे.
6 जानेवारी : धुळे,नंदुरबार
7 जानेवारी : धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर
8 जानेवारी : ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग
9 जानेवारी : मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग
मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता
हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आगामी 4 दिवसात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 ते 9 जानेवारी दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर नाशिक,अहमदनगर ठाणे आणि पालघर मध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्येही पाऊस हजेरी लावू शकतो.
8 जानेवारीला विदर्भात यलो ॲलर्ट
बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना 8 जानेवारीला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
अवकाळीचा शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार?
आगामी चार दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि आर्थिक संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं आणखी एकदा नुकसान होण्याची भीती आहे.
No comments:
Post a Comment