वेध माझा ऑनलाइन-मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली आहे. त्यापाठोपाठ ओमायक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहे. आता त्यापाठोपाठ राज्यातील सर्व महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम चालू करण्याबाबत शासनाने आदेश काढला आहे.
दोन दिवसांपूर्वीच उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कॉलेजेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर आज राज्य सरकारकडून तसा आदेश काढण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment