वेध माझा ऑनलाईन - मुंबईमधील कोरोनाबाधितांच्या स्पाईकमध्ये ओमायक्रॉनचाच हात असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. एनडीटीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत असताना डॉ. चहल यांनी याबात माहिती दिली आहे.
सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ञांनी दिल्याची माहिती डॉ. चहल यांनी या विशेष मुलाखतीत दिली आहे. असं असलं तरी सध्या तरी ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कॉरंटाईन तसंच होम कॉरंटाईन करण्यासाठी विषेश प्रोग्राम राबवल्याची माहितीही डॉ. चहल यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment