Monday, January 3, 2022

दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित ; पुण्याच्या महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आढावा बैठकीत वक्तव्य...

वेध माझा ऑनलाईन - पुण्यातून कोरोना संदर्भातली एक मोठी बातमी समोर येत आहे. नुकतीच पुणे महापालिकेची कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यात दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित होताना दिसत असल्याचं समोर आले आहे. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.

27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ दिवसात पुण्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्या चौपट झाल्याचंही समजतंय. नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जातं असून 80 टक्के लोक दोन्ही डोस घेतलेली बाधित होताना दिसत असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment