Friday, January 7, 2022

लायन्स क्लब आँफ कराडच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन...

वेध माझा ऑनलाइन 
कराड210 देशामध्ये कार्यरत असलेला लायन्स क्लब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहे.लायन्स क्लब आँफ कराडने सामाजिक कार्याबरोबरच इतरही अनेक अँक्टीव्हिटी राबवत असतो.या वर्षी क्लबने दिनदर्शिका प्रकाशीत केली आहे.यामधून जमा होणारा निधी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याचा मानस आहे..

याचे प्रकाशन व वितरण सातारा जिल्ह्याचे खा.श्रीनिवास पाटील,कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले,दि.कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी  लायन्स क्लबचे कार्य खरोखरच समाजोपयोगी असून याचा फायदा सामान्य जनतेला होत आहे. क्लबचे लायन्स आय हाँस्पीटल तालुका व परिसरातील जनतेसाठी सेवाभावी वृतीने कार्य करत आहे याचा आनंद आहे. या  कार्यास लागेल ती मदत व  सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी मान्यवरांनी दिले.
यामध्ये क्लबचे अध्यक्ष ला.खंडू इंगळे,सचिव संजय पवार, खजिनदार मिलिंद भंडारे व क्लबच्या सदस्यांनी योगदान लाभले.

No comments:

Post a Comment