Friday, January 7, 2022
राज्यात लवकरच लागू होणार विकेंड लॉक डाऊन ? आज निर्णय होणार ! ...
वेध माझा ऑनलाइन - देशभरात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या पाहता ओमायक्रॉनच्या त्सुनामीला सुरुवात झाल्याचं चित्र समोर आलंय. देशात काल १ लाखांवर रुग्णांची नोंद झाली, तर राज्यात ३६ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली. मुंबईनं कालच २० हजारांचा टप्पा पार केला. मुंबईत रुग्णसंख्या २० हजारांवर गेल्यानंतर निर्बंध वाढवण्याबाबत निर्णय घेऊ असं महापालिका आयुक्त आणि महापौरांनी सांगितलं होतं. त्यामुळे कठोर निर्बंधांचा निर्णय सरकार घेणार का याची उत्सुकता आहे. विकेंड लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment