वेध माझा ऑनलाइन - जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा वेगानं संसर्ग होत आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. सगळ्याच देशांत लसीकरण मोहीम जोमानं सुरु आहे. ओमायक्रॉनवर लस बनवली जात असल्याची माहिती औषध निर्माण कंपनी फायझरनं दिली आहे. मार्च महिन्यापर्यंत ही लस उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोविड 19 चा संसर्ग वाढत असल्याने फायझर आधीपासूनच लस निर्मिती करत आहे. अनेक सरकारच्यावतीनेही लसीबाबत वारंवार विचारणा केली जात आहे, सध्याच्या रुग्णसंख्येत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. ही लस मार्च 2022 पर्यंत तयार होईल, असं फायझर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बुर्ला यांनी म्हटल्याचं CNBC च्या एका वृत्तामध्ये म्हटलं आहे. ‘आता या लसीची गरज पडेल का? ती वापरली जाईल का ? याबद्दल मला माहिती नाही. पण कंपनीने ती तयार केली आहे,’ असंही अल्बर्ट यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment