Friday, January 7, 2022

कराड शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याबाबतचा निर्णय अखेर मागे ; दोन वेळा होणार पाणीपुरवठा... मुख्याधिकारी डाके यांनी दिले आश्वासन...

वेध माझा ऑनलाइन -  कराड पालिकेस साडे चार कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने मंगळवार दि. 11 जानेवारीपासून कराड शहरात केवळ सकाळी एकच वेळेचा पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी निवेदनाद्वारे कळविले होते मात्र आज सकाळी येथील सामाजिक गब्बर ग्रुपसह शहरातील काही लोकप्रतिनिधी व जागरूक नागरिकांनी सी ओ याना भेटून हा निर्णय मागे घेण्याबाबत विनंती केली त्यानंतर सी ओ डाके यांनी हा निर्णय मागे घेतला रोज दोन वेळा 45 मिनिटे पाणी पुरवठा होईल असे त्यांनी यावेळी जाहीर केले

दरम्यान,दररोज दोन वेळा हा पाणीपुरवठा केला जातो यासाठी नगरपालिकेला सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च आहे मात्र उत्पन्न कमी आहे पलिकेला एम ए सी बी चे बीलावर मोठा खर्च करावा लागतो मात्र सध्या नगरपालिकेस ही योजना चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. आठ कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा सुरू ठेवत असताना यात साडेचार कोटींचा तोटा होत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी सध्या नगरपालिकेकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत, एक म्हणजे उत्पन्नवाढीसाठी पाणीपट्टी वाढवणे आणि दूसरा खर्चात कपात करणे.शहरात दोन वेळा होणारा पाणीपुरवठा हा ज्यादा आहे, त्यामुळे जर पाणीपट्टीत वाढ करायची नसेल आणि तोटा भरुन काढायचा असेल तर एक वेळचा  शहरातील पाणी पूरवठा बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी कालच सांगितले होते. मात्र त्यानंतर शहरात या निर्णयाबाबत उलट सुलट व संतप्त प्रतिक्रीया येऊ लागल्या होत्या काही सामाजिक व्हाट्स अँप ग्रुप वरून याविषयी अनेक चर्चा होऊन विशेषतः शहरातील गब्बर ग्रुप या सामाजिक ग्रुप ने पुढाकार घेत आज (शनिवारी) पालिकेत सी ओ डाके याना भेटून हा झालेला निर्णय मागे घेण्याबाबत विनंती करण्यात आली त्यानुसार आज सी ओ डाकेनी हा निर्णय मागे घेतला
दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होईल मात्र त्यासाठी प्रत्येकवेळी 45 मिनिटे कालावधी असेल असे सी ओ डाके यावेळी म्हणाले

No comments:

Post a Comment