वेध माझा ऑनलाइन - पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेनं नागपूरचे संघ मुख्यालयासह इतर संवेदनशील ठिकाणी रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागपूरमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासह इतर ठिकाणाची दहशतवादी जैश ए मोहम्मद संघटनेकडून रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँक इतर संवेदनशिल भागाची रेकी केल्याचे पुढे आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे. या प्रकरणाचा क्राइम ब्रँच तपास करत आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
No comments:
Post a Comment