Wednesday, January 5, 2022

राज्यस्थानमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू ; महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण...

वेध माझा ऑनलाईन - देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट अधिक धोकादायक नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
मात्र, भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार राज्यस्थानमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाला आहे.

भारतामध्ये ओमायक्रॉन रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. बुधवारी देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 2135 वर गेली आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळ या राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत.

No comments:

Post a Comment