Friday, January 7, 2022

रिक्षाचं भाडं देण्यासाठी पैसे नसल्याने रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; पुण्यातील घडली ; आरोपीस अटक...

वेध माझा ऑनलाइन - रिक्षाचं भाडं देण्यासाठी पैसे नसल्याने रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली आहे


हडपसरमधील रेसकोर्स परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रिक्षाचं भाडं देण्यासाठी पैसे नसल्याने रिक्षाचालकाने बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी रोजी घटना घडली आहे. पीडित मुलगी नेपाळची असून कामाच्या शोधात पुण्यात आली होती. ५ तारखेला संध्याकाळी हडपसर ते बुधवार पेठ प्रवास करण्यासाठी ती निघाली होती. पण यावेळी पैसे नसल्याने रिक्षाचालकाने आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत रिक्षाचालकाला अटक केली. रिक्षाचालका व्यतिरिक्त आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुलीने आपण नंतर पैसे देतो अशी विनंती केली होती. पण रिक्षाचालकाने ती मान्य करत तिला एका झाडीत नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नावं सागर बिभीषण बचुट (२४) असे आहे.

तसेच या घटनेपूर्वी १५ दिवस अगोदर पिडीत मुलीची विकी पासवान आणि अशोक थापा या दोघांनी छेड काढली होती. अशी तक्रार देखील पीडित मुलीने पोलिसांना दिल्याने, या तक्रारीनुसार त्या दोघांन अटक केली आहे. यामुळे या दोन्ही प्रकरणी एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे हडपसर पोलिसानी सांगितले.

No comments:

Post a Comment