वेध माझा ऑनलाइन - येथील आझाद चौक येथे महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन अज्ञात दूचाकी स्वाराने हिसकावून नेल्याची घटना आज घडली
दूचाकी वरुन आलेला हा चोरटा तिथेच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे याबाबत मिळालेल्या माहिती नूसार कराड येथील आझाद चौकापासून सात शहीद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून एका दुचाकी वरून आलेल्या चोरट्याने पोबारा केला. नागरिकांनी तेथे आरडाओरडा केला परंतु चोरटा पसार झाला मात्र तेथे नजीकच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा चोरटा कैद झाला आहे अशी चर्चा आहे
No comments:
Post a Comment