Saturday, April 30, 2022

आता जेलमध्ये कैद्यांना मिळणार विनातारण 50 हजारांचं कर्ज ; राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली माहिती

वेध माझा ऑनलाइन - विविध गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये असलेल्या कैद्यांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोठी बातमी आहे. आता जेलमध्ये कैद्यांना कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज घेण्यासाठी त्यांना तारण लागणार नाही.  जेलमध्ये कैद्यांना 50 हजारांचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. 


पुण्यात आयोजित महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळं कैद्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, राज्यात काही राजकीय सभा आहेत. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी आम्ही घेतोय. आम्ही सज्ज आहोत, असं वळसे पाटलांनी म्हटलं. 
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आता राज्यातील जेलमध्ये असणाऱ्या कैद्याला कर्ज दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने प्रस्ताव दिला होता. त्याला सरकारने मंजुरी दिली आहे. ते कर्ज आजपासून वाटप सुरू होत आहेत. 50 हजार रुपये कर्ज दिलं जाणार आहे, असं त्यांनी म्हटलं. वळसे पाटलांनी सांगितलं की, कोर्टाने त्यांना दंड केलेला असतो त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणूण त्यांच्यासाठी हे कर्ज असणार आहे. जेलमध्ये काम करून पैसे भरणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की,  राजकीय सभा किंवा कार्यक्रम सुरू असतात. कायदा सुव्यवस्था ठेवणे पोलिसांचं काम आहे. पोलीस विभाग सज्ज आहे. सर्वांनी सामाजिक सलोखा ठेवावा. सभेला परवानगी दिली ती अटी शर्थी टाकून दिली आहे, असं ते म्हणाले. 

कैद्यांना कर्ज उपलब्ध करून देणारी ही देशातील पहिली योजना
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी कर्ज देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.  कैद्यांना कर्ज उपलब्ध करून देणारी ही देशातील पहिली योजना असून आज 1 मे रोजी या योजनेची सुरुवात होतेय. कारागृहात दीर्घ मुदतीची शिक्षा भोगणाऱ्या परंतु चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना राज्य सहकारी बॅकेकडून कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज कैद्यांच्या नावे असेल मात्र त्याचा उपयोग कैद्याचे नातेवाईक वेगवेगळ्या कारणांसाठी करु शकणार आहेत. कैद्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कर्ज मिळण्यासाठी होण्याऱ्या अडचणी यातून दूर होणार आहे.  येरवडा कारागृहातील 250 कैद्यांची कर्ज योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे.

कराडचा गब्बर ग्रुप "रोटरी अवॉर्ड' ने सन्मानित ; गब्बर ग्रुपच्या सामाजिक कार्याचा झाला गौरव...आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान; गब्बर ग्रुपचे सर्वत्र होतय अभिनंदन...

वेध माझा ऑनलाइन - कराड येथील सामाजिक कार्यात अग्रेसर  असणाऱ्या गब्बर ग्रुपला कराड रोटरी क्लबचा मानाचा व प्रतिष्ठेचा सामाजिक विभागातून दिला जाणारा यावर्षीचा कराड रोटरी अवार्ड  2021 - 2022 पुरस्कार आज सन्मानपूर्वक आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला 

यावेळी आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गब्बर ग्रुपने लोकहिताचे सामाजिक कार्य करून मोठा नावलौकिक मिळवला आहे या ग्रुपने कोविड काळात मोठं काम केलं आहे अनेकांना सर्वतोपरी मदत करत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांच्या कार्याने आपल्या गावाचा लौकिक वाढला आहे असे गौरवोद्गार देखील त्यांनी याप्रसंगी काढले

कराड येथील सामाजिक कार्यात येथील गब्बर ग्रुप हा नेहमीच अग्रेसर असतो कोविड काळापासून ते शहरात पूर परिस्थिती असो किंवा कोणतेही जनहीताचे सामाजिक कार्य असो या ग्रुप ने पुढे होऊन ते कार्य तडीस नेत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे 
जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आवर्जून या ग्रुपचे खुलेआम कौतुकही केले आहे

कराडच्या रोटरी क्लबने या ग्रुपच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्याची दखल घेत या ग्रुपला यावर्षीचा सामाजिक विभागातून दिला जाणारा कराड रोटरी अवार्ड हा पुरस्कार जाहीर केला होता आज सन्मानपूर्वक हा पुरस्कार आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी गब्बर ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते
 


आमदार गणेश नाईक यांना कधीही होणार अटक ; अटकपूर्व जामीन फेटाळला

वेध माझा ऑनलाइन - भाजपचे नेते गणेश नाईक यांना ठाणे सेशन कोर्टाने मोठा दणका दिला आहे. कोर्टाने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता गणेश नाईकांना कधीही अटक होण्याची दाट शक्यता आहे. एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे सेशन कोर्टाने याआधी 21 एप्रिलला देखील अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यावेळी 27 एप्रिलला सुनावणी होईल, असं जाहीर केलं होतं. अखेर सेशन कोर्टाने आज गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

बेलापूर पोलीस ठाण्यात शस्त्र दाखवून धमकावणे आणि नेरुळ पोलिसात बलात्कार विरोधात पीडितेने तक्रार केली होती. या दोन्ही प्रकरणात गणेश नाईकांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. गणेश नाईक सारखी प्रतिष्ठित व्यक्ती या केस संदर्भात फिर्यादीवर दबाव टाकू शकते, या कारणाने ठाणे कोर्टाने दोन्ही गुन्ह्याप्रकरणी जामीन फेटाळला आहे. विशेष म्हणजे दोन्ही पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांच्या कस्टडीची मागणी केली होती. पोलिसांना बलात्कार प्रकरणात मेडिकल करायची होती. शस्त्र दाखवण्याच्या प्रकरणात हत्यार जप्त  करण्यासाठी गणेश नाईक यांच्या कास्टडीची मागणी करण्यात आली होती.

आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत ; राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचे सभा होण्याअगोदर मोठ विधान...

वेध माझा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसरी सभा औरंगाबाद येथे उद्या 1 मे रोजी पार पडत आहे. या सभेची मनसेने जय्यत तयारी केली आहे. या सभेला गर्दीची मर्यादा घालण्यात आली असली तरी ही सभा विक्रमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज सकाळीच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊ मैदानाची पाहणी केली. स्टेज कुठे बांधण्यात येणार आणि कसा बांधला जाणार याची सर्व माहिती त्यांनी घेतली. तसेच काम करणाऱ्या कामगारांशी चर्चाही केली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पण मोजकेच बोलले. सभेला आवाजाची मर्यादा घालण्यात आली आहे. हा मोठा अडथळा आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता? असं अमित ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर आम्ही अंगावर केसेस घ्यायलाही तयार आहोत, असं मोठं विधान अमित ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे उद्याची राज ठाकरे यांची सभा दणदणीत आणि खणखणीतच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पोलिसांनी सभेसाठी काही अटी घातल्या आहेत. त्यात आवाजाची मर्यादाही आहे. 50 ते 55 डेसिबलपर्यंत आवाज असावा असं पोलिसांनी म्हटलं आहे. हे पाळणं शक्य आहे का? असा सवाल अमित ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर तेवढं ठीक आहे. आम्ही केसेस घ्यायला तयार आहोत. तुम्हाला आधीही बोललो आहे, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.
काही पक्षप्रवेश होते आणि सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. मी समाधानी आहे. माझ्या सहीत सगळ्यांना राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता आहे. ही सभा ऐतिहासिक होईल एवढे नक्की, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं. बाकीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही. आमचे वरिष्ठ नेते बोलतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अमित ठाकरे यांनी आज सभा स्थळी जाऊन तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सभेच्या अनुषंगाने काही सूचनाही दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांशी सेल्फीही काढला. नंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केलं.
अमित ठाकरे सभेची पाहणी करत आहेत. ही सभा जोरदार होणार आहे. संपूर्ण राज्यातून लोकं येणार आहेत. ही सभा रेकॉर्ड ब्रेक होईल. मनसेची सभा देखणी व वेगळी असते. किती लोकं येतात ते बघू, पण सभा प्रचंड होईल. पोलीस त्यांचं काम करतील. आम्ही आमचं काम करू. आम्ही त्यांनी घातलेल्या शर्थीचं काटेकोरपणे पालन करणार. राज जी भूमिका पाळत असतात तशी ती अंमल बजावणी करतात, असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं शिवसेनेच्या पालिकेच्या कारभाराला शिवसेना कंटाळली आहे. आम्हाला देखील सभा यशस्वी करायची आहे. सभा शांततेत होईल. आम्ही कार्यकर्त्यांना शांततेत येण्यासाठी सांगितले आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड होता आता नाही, असा चिमटाही सरदेसाई यांनी काढला.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची कोट्यवधींची संपत्ती जप्त ; ईडी ची कारवाई...

वेध माझा ऑनलाइन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री 'जॅकलिन फर्नांडिस' हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्रीविरोधात ईडीने महत्त्वाची कारवाई केली आहे. ईडीने जॅकलिन फर्नांडिसची संपत्ती जप्त केली आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे.

 ईडी ने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, कॉनमन सुकेश चंद्रशेखर ज्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे ती फिक्स्ड डिपॉझिट असल्याची माहिती ANI ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
सुकेश चंद्रशेखरला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झालेली असून त्याचे नाव बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसह जोडले गेले. यामध्ये जॅकलिनचे नाव आघाडीवर होते. तो या सेलिब्रिटींना महागड्या वस्तू पाठवत असल्याचे समोर आले होते 200 कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंग प्रकरणाशिवाय याआधीही त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले होते.

Friday, April 29, 2022

कराडातील यावर्षीचा शिवजयंती उत्सव आदर्शवत होणार ; नगरसेवक अण्णा पावसकर - शिवजयंती सोहळ्यात हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज सहभागी होणार...नगरसेवक फारूक पटवेकर

वेध माझा ऑनलाइन - कराडातील होणारा शिवजयंती उत्सव व दरबार मिरवणूक खास पहाण्यासाठी म्हणून जिल्ह्यांतील शिवभक्त जास्तीत जास्त संख्येने इथे येतील असा आदर्शवत  शिवजयंती उत्सव यावेळी होणार असल्याचे सूतोवाच हिंदू एकता आंदोलनाचे नेते नगरसेवक अण्णा पावसकर यांनी आज येथे केले शहरातील असणाऱ्या मंडळांना पोलिसांनी स्पीकर परवाना द्यावा कोणत्याही अनावश्यक निरबंधनाशिवाय या सोहळ्याला प्रशासनाने सहकार्य करावे अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली
कराड शहर पोलीस ठाण्याच्यावतीने शिवजयंती व रमाजन ईदच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजित बोराडे, पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नगरसेवक फारूक पटवेकर म्हणाले 
अण्णा पावसकर यांनी माझ्या रूपाने एका मुस्लिम कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून शहराची सेवा करण्याची संधी दिली याची जाणीव आहेच
शहरात प्रत्येकवर्षी शिवजयंती सोहळा हिंदु- मुस्लिम एकत्र येऊन साजरा करत असतो याही वेळी मुस्लिम बांधव हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून हा उत्सव साजरा करणार आहोत यावेळी निघणाऱ्या दरबार मिरवणुकीतील सर्व बांधवांना मुस्लिम बांधवांकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देण्यात येणार आहेत मिरवणूक मार्गात विविध ठिकाणी या बाटल्या देण्याची व्यवस्था मुस्लिम समाजाच्या वतीने केली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले छत्रपती शिवराय हे एका जातीधर्माचे राजे नव्हते तर ते संपूर्ण रयतेचे राजे होते त्यांनी मुस्लिम समाजाला अनेक ठिकाणी मस्जिद बांधून दिल्या आहेत आजही अनेक ठिकाणी त्यांचे अस्तित्व आहे असे सांगून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही दिल्या

कराडच्या भूमिने नेहमीच आदर्शांची जपणूक केली आहे. त्यामुळे येणारे सगळेच सण हिंदु-मुस्लिम एकत्रित साजरे करत कराडचे ऐक्य अबाधित राखतील असा विश्‍वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला

यावेळी, अजयकुमार बन्सल म्हणाले, यापूर्वीच्या घडलेल्या काही घटनांमुळे कराडबाबत संवेदनशीलतेचा ठपका लागला आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कराड ज्या पध्दतीने सर्व धर्मसमभावाने काम करत आहे. हे पाहिल्यानंतर कराडबाबत असणारे गैरसमज दूर होत आहेत. या ऐकोपा भविष्यातही असाच कायम रहावा. येणारे सण, उत्सव सर्व जाती धर्मांनी एकत्रितपणे साजरे करावेत. हे करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकारने खालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, विजय वाटेगावकर, मजहर कागदी, दादा शिंगण, नितीन काशिद, अ‍ॅड. विकास पवार, आनंदराव लादे, प्रशांत यादव, आप्पासाहेब गायकवाड, जयंत बेडेकर यांनी शिवजयंती व रमाजन ईद हे दोन्ही सण उत्साहाने व एकोप्याने साजरे होतील याबाबत प्रशासनने निश्‍चिंत रहावे, अशी ग्वाही दिली.
बैठकीस शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर, शिवसेनेचे काकासोा जाधव, राजेंद्र माने  शहरप्रमुख शशिराज करपे, जावेद नायकवडी, अल्ताफ शिकलगार यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.
 बी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले तर पोलीस उपधिक्षक डॉ. रणजित पाटील यांनी आभार मानले. 

राज ठाकरे यांना MIMचे इम्तियाज जलील यांनी दिलं इफ्तारचं निमंत्रण

वेध माझा ऑनलाइन -  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इफ्तारसाठी येण्याचे निमंत्रण दिलं.

यावेळी बोलताना जलील यांनी सांगितलं, राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभमीवर पोलिस कमिशनरांची भेट घेतली आहे. यावेळी आम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करु शकतो किंवा आमची मदत हवी आहे का अशी विचारणा केली. तसंच या सभेदरम्यान आम्ही औरंगाबादमध्ये कशी शांतता राखू शकतो यासाठीही चर्चा केली असल्याचं जलील म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी राज यांना इफ्तारसाठी निमंत्रण दिलं. ते म्हणाले, राज ठाकरे साहेब येणार आहेत मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर त्यांची सभा होणार आहे. त्याआधी राज यांनी आमच्यासोबत इफ्तारसाठी यावे असंही ते म्हणाले.
तसंच या सभेनंतरही आपण सगळे हिंदू-मुस्लीम एकत्र राहू. जिल्ह्याला पुढे घेऊन जायच जर सगळ्यांनी ठरवलं तर कोणीही थांबवू शकत नाही. एक टक्केच लोक दंगा करत असतात, मात्र त्यासाठी पोलीस आहेत आपला पोलिसांवर विश्वास आहे. शिवाय पोलिसांनी लोकप्रतिनिधिंना हाताशी धरुन शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा असही ते म्हणाले. दरम्यान, भोंग्याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, भोंग्यांच्या विषयाबाबत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी योग्य पद्धतीने खुलासा केला आहे. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत, कोर्टाच्या नियमांप्रमाणे कारवाई व्हावी मात्र जोरजबरदस्ती करु नये असही ते म्हणाले.

... तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतुक करणार नाहीत : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टोला...

वेध माझा ऑनलाइन - जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतुक करणार नाहीत असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. राज ठाकरे यांनी आधी गुजरातचं कौतुक केलं, आता यूपीचे करत आहेत असंही ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्रात राज ठाकरेंचे बंधू मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करणार नाहीत. आधी त्यांनी गुजरातचे कौतुक केलं, आता यूपीचे करत आहेत. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांचे कौतुक करण्यासाठी ते त्या राज्यांचा दौरा करतीलच. कोणाला सभा करायची तर त्यावर बंदी करण्याची गरज नाही. 
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या धार्मिक भोंग्यांवरील कारवाईवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, त्यांनी एखादी गोष्ट केली म्हणजे आपण केली पाहिजे असं नाही. शब्दांच्या कोट्या विरोधी पक्षांना कराव्या लागतात
भारतात महागाई प्रचंड वाढली आहे, महागाईमुळे श्रीलंकेत काय झालं हे दिसलं. केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे, ते राज्याला दोष देत आहे असं जयंत पाटील म्हणाले. 
भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चेवर ते म्हणाले की, अशी कधी चर्चा झाली नव्हती. आमची काँग्रेस बरोबर आघाडी होती. आमच्या बरोबर भाजपने चर्चा का केली असेल? त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो. या हवेतील गप्पा आहेत. भाजप सत्तेत असताना, शिवसेना बरोबर असताना भाजपने आमच्याशी चर्चा का केली असेल?

Wednesday, April 27, 2022

भाजप आणि राष्ट्रवादीच सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात 2017 मध्येच झाली होती चर्चा ; जागा वाटप आणि सत्तेत आल्यावर खातेवाटप याचीही झाली होती चर्चा...भाजप नेते आशिष शेलार यांनी केला गौप्यस्फोट

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर भाजप नेते आरोपांवर आरोप करत आहेत. तर मविआचे नेते त्या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपवर सुद्धा आरोप करताना दिसून येत आहेत. मात्र, असे असतानाच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापनेच्या संदर्भात 2017 मध्येच ठरलं होतं असा गौप्यस्फोट शेलारांनी केला आहे. दैनिक लोकसत्ताने आयोजित केलेल्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे विधान केलं आहे.

ते पुढे म्हणाले, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात 2017 मध्येच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटप आणि त्यानंतर सत्तेत आल्यावर खातेवाटपाच्या संदर्बातही चर्चा झाली होती. भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार असण्याच्या संदर्भात चर्चा झाली.
शिवसेनेला दूर न करण्याचा सल्ला भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी दिला होता. पण शिवसेना सोबत असताना युती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला आणि त्यामुळे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन झालं नाही असं आशिष शेलार म्हणाले. 
बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना-भाजप युतीमध्ये मैत्रिपूर्ण संबंध होते. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेत्रृत्वात शिवसेनेसोबत भाजपचे पूर्वीसारखे मैत्रीपूर्ण संबंध राहिले नाहीत असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.आशिष शेलार यांनी केलेल्या या विधानावर आता राष्ट्वादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पहावं लागेल. 

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला अटी आणि शर्तींसह मिळणार परवानगी; आज दुपारी 12 वाजेपर्यंत परवानगीचा निघणार आदेश ; खात्रीलायक वृत्त...

वेध माझा ऑनलाइन - राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे. अटी आणि शर्तींसह राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी दिली जाणार असून आज दुपारी 12 वाजेपर्यंत परवानगीचा आदेश निघण्याची शक्यता आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. तसेच, पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, अशी अट घालण्यात येणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या परवानगीबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मनसे नेत्यांसह पोलीस आयुक्तांनीही माहिती दिली आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अटी शर्तींसह परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सभास्थळाची पाहणी केली, तसेच पोलिसांचीही भेट घेतली होती. तर राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणारी सभा ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. तसेच, मनसे नेते बाळा नांदगावकरांनाही सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी औरंगाबादेतील मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांचीही भेट घेतली. 


आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणच्या ग्रामपंचायतीसाठी ७५ लाख रुपयांचा निधी...


वेध माझा ऑनलाइन -  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोटे, येणके, धोंडेवाडी, तुळसण व म्हासोली या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम हे ३५ ते ४० वर्षांपूर्वी झालेले असून इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. जुन्या इमारतीमध्ये जागा अत्यंत तोकडी असून रोजचे कार्यालयीन काम करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेअंतर्गत निधी मंजूर व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या  ग्रामविकास मंत्र्यांकडे निधीची मागणी केली होती त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाख रुपये असा एकूण ७५ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. 

गावातील ग्रामस्थांचे दैनंदिन कामासाठी ग्रामपंचायतीत येणे जाणे असते, यासाठी ग्रामपंचायतीच्या इमारती सुस्थितीत असणे आवश्यक असते. आ. पृथ्वीराज चव्हाण मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान गावागावांना भेटी देत असतात. यावेळी ग्रामस्थांच्या सोबत चर्चा करताना घेतलेल्या माहितीनुसार व प्रत्यक्ष पाहणीनुसार या पाच ग्रामपंचायतीचे बांधकाम नवीन होणे आवश्यक असल्याने या ग्रामपंचायतीना निधी मिळण्यासाठी आ. चव्हाण यांनी प्रयत्न केले होते, हा निधी मंजूर झाला असल्याने लवकरच या गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालय मिळेल.

प्रथमच, मानवामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आला आढळून....;

वेध माझा ऑनलाइन - जगात प्रथमच, मानवामध्ये एच3एन8 बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या हेनान प्रांतात  बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, मंगळवारी ही माहिती समोर आली आहे. त्याच वेळी, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जारी केलेल्या निवेदनात ही बाब घोषित करण्यात आली आहे.
पण त्याचवेळी लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही. H3N8 बद्दल अधिक माहिती देताना चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, एका चार वर्षांच्या मुलाला याचा त्रास झाला होता. NHC नुसार, तापासह अनेक लक्षणे विकसित झाल्यानंतर मुलाला H3N8 विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले.

त्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही व्यक्ती या विषाणूच्या विळख्यात आली नाही, ही दिलासादायक बाब आहे. NHC नुसार, मुलगा त्याच्या घरात पाळलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये तापासह अनेक लक्षणे दिसली आणि तपासणीत त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले.

महामारीचा धोका कमी -
आरोग्य आयोगाने सांगितले की H3N8 प्रकार घोडे, कुत्रे आणि पक्ष्यांमध्ये जगात प्रथम आढळला आहे. तथापि, H3N8 चे कोणतेही मानवी प्रकरण नोंदवले गेले नाही. म्हणजेच ही जगातील पहिली मानवी केस आहे. या प्रकारात अद्याप मानवांना प्रभावीपणे संक्रमित करण्याची क्षमता नव्हती. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार होण्याचा धोका कमी आहे.

Tuesday, April 26, 2022

नवनीत राणा यांनी युसुफ लकड़ावालाकडून 80 लाख रुपये घेतले; त्याचे डी गँगशी संबंध होते ; संजय राऊत यांनी पुराव्यासह फोटो केला ट्वीट ;

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरापुढे हुनमान चालीसा पठण प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे. ईडीने अटक केलेल्या युसुफ लकडवाला याच्याकडून नवनीत राणांनी 80 लाखांचे कर्ज घेतले, असा गंभीर आरोप पुराव्यासह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून नवनीत राणा यांच्यावर आरोपाचा बॉम्ब फोडला आहे.  नवनीत राणा यांनी युसुफ लकड़ावालाकडून 80 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. युसुफ लकडावाला याचा जेलमध्ये मृत्यू झाला आहे. याच लकडवालाला ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती, असा धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.युसुफ लकडावाला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने अटक केली होती, त्यावेळी त्याचे डी गँग अर्थात अंडरवर्ल्डशी संबंध होते. मग या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पुराव्यासह फोटो सुद्धा ट्वीट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवनीत राणांवर होणार आणखी गुन्हे दाखल
दरम्यान, नवनीत राणा यांनी कोठडीत असताना आपल्याला दलित असल्यामुळे पाणी देण्यास नकार दिला असा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमुळे राजकीय वाद पेटला आहे. पण, पोलीस आयुक्तांनी चहापान घेत असतानाचा व्हिडीओ समोर आणून राणा यांचा दावा खोडून काढला होता. पण, आता त्यांनी वापरलेले दलित कार्ड हे त्यांच्यावर उलटण्याची दाट शक्यता आहे.
नवनीत राणा यांचा पोलिसांविरोधात अँट्रासिटी केस दाखल करण्याचा प्लॅन केला होता. मात्र तो आता फेल जाताना दिसत आहे.  तक्रार नोंदवणारे आणि तक्रार नोंदवून घेणारे अधिकारी एकाच प्रवर्गातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  राणा यांच्या तक्रारीत खार पोलीस ठाण्यात चुकीच्या वागणुकीचा उल्लेख आहे. मात्र मध्यरात्री राणा या सांताक्रुझ पोलीस ठाण्यात होत्या. नवनीत राणा यांच्यावर पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, पोलिसांवर खोटे आरोप करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.  गृह खात्याचा रिपोर्ट लवकरच लोकसभा सचिवांना पाठवण्यात येणार आहे. गृह खात्याच्या रिपोर्टनंतर नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे,   नवनीत राणा यांना कोठडीत पाणी दिले होते पण त्यांनी ते पाणी घ्यायला नाकारले. त्यामुळे त्यांना बिसलरीचे पाणी, स्पेशल चहा आणि जेवणही दिले. राणा करत असलेल्या आरोपात तथ्य नाही. आमच्याकडे सांताक्रुझ पोलीस ठाणे आणि पोलीस कोठडीतले सीसीटिव्ही फुटेज आहेत, अशी माहितीही  पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.

आता कराडच्या दत्त चौकात "चंदुकाका सराफ'ची जाहिरात शिवछत्रपतींच्या फोटोसह होणार प्रदर्शित...

वेध माझा ऑनलाइन -  कराड येथील दत्त चौकात असलेल्या शिवश्रुष्ठी संकुलवर चंदुकाका सराफ या सोन्याचांदीच्या दुकानची जाहिरात असते तिथे छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांच्याबाबतच्या ऐतिहासिक मजकुरासह त्यांचे या जाहिरातीत फोटोही लावण्यात यावेत या मागणीचे निवेदन येथील शिवप्रेमीच्या वतीने चंदुकाका सराफ याना आज देण्यात आले आहे हे फोटो येत्या 1 ते 16 मे या कालावधीत लावण्यात यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे

येथील दत्त चौक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यामागे शिवश्रुष्ठी संकुल आहे त्याच्या वरच्या मजल्यावर दर्शनी भागात म्हणजे रस्त्याकडे तोंड करून अनेक जाहिराती लावल्या जातात
त्याठिकाणी कायम स्वरूपी येथील चंदुकाका सराफ या सोनाचांदी दुकानच्या दागिन्यांची जाहिरात प्रदर्शित होत असते 
इथून पुढे त्याठिकाणी शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक मजकूरासह व त्यांच्या ऐतिहासिक फोटोसह चंदुकाका सराफची जाहिरात लावली जावी या मागणीचे निवेदन चंदुकाका सराफ याना आज येथील शिवप्रेमीकडून देण्यात आले हे फोटो येत्या 1 ते 16 मे या कालावधीत लावण्यात यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे
यावेळी येथील चंदुकाका सराफ मॅनेजमेंटच्या वतीने या केलेल्या मागणीनुसार त्याठिकाणी ऐतिहासीक फोटो व मजकूर लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे 

खा. श्रीनिवास पाटील यांनी दिला शरद पवारांच्या गाडीला धक्का...

वेध माझा ऑनलाइन -  कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  यानंतर शरद पवार, शाहू महाराज आणि खासदार श्रीनिवास पाटील गोल्फ कार्टमधून हे प्रदर्शन पाहत होते. या गाडीच सारथ्य गृहराज्यमंत्री सतेज पाटील करत होते.अर्ध्याहून अधिक प्रदर्शन पाहून झाल्यावर इलेक्ट्रीक गाडीत काही तरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे गाडी काही सुरू होईना त्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील गाडीतून खाली उतरले आणि चक्क गाडीला धक्का देण्यासाठी त्यांनी हात लावला.

वयाची ८० वर्षे पार केलेले श्रीनिवास पाटील यांनी वयाची तमा न बाळगता यावेळी गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यानं कार्यतत्परता दाखवली. गाडीत बसलेले शरद पवार यांना पुढील नियोजित सभेला पोहोचण्यास यामुळे वेळ लागू शकतो हे बरोबर ओळखून खासदारांनी गाडीला धक्का दिला. जमलेल्या नागरिकांनी ही खासदारांची कृती पाहीली आणि क्षणभर काय होत आहे हे कुणाला काही समजलंच नाही. नंतर मात्र शरद पवार यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहीलं आणि ते सभास्थळी रवाना झाले. 

औरंगाबाद येथे जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त चुकीचं ; औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - औरंगाबाद येथे जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. औरंगाबादेत आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आलं होतं. हे वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी याबाबत माहिती दिली.

“औरंगाबाद पोलिसांनी केवळ मुंबई पोलीस अॅक्ट अन्वये आदेश जारी केला आहे. असे आदेश वर्षभर काढले जात असतात. ही चुकीची माहिती आहे. कलम १४४ अंतर्गत कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या आणि शस्त्र बाळगणं यावर आम्ही लक्ष ठेवत असतो. ही सामान्य प्रक्रिया आहे,” असं निखिल गुप्ता म्हणाले.कोणत्याही सभेमुळे किंवा कारणामुळे हे आदेश काढले जात नसून हा एक नियमित आदेश असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या सभेविषयीदेखील भाष्य केलं. “राज ठाकरे यांच्या मराठा सांस्कृतिक मंडळात होणाऱ्या सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर पोलिसांकडून अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात येईल,” असंही गुप्ता यांनी स्पष्ट केलं.


नवनीत राणांचा खोटेपणा झाला उघड! कोठडीत निवांत चहा पीत बसल्याचा व्हीडिओ झाला व्हायरल... कोठडीत दुर्व्यवहार होत असल्याचा आरोप त्यानी केला होता...


वेध माझा ऑनलाइन - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्यासोबत जेलमध्ये दुर्व्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांची दखल स्वत: लोकसभा अध्यक्षांनी देखील घेतली आहे. त्यामुळे लोकसभा सचिवालयातून राज्य सरकारला पत्र पाठविण्यात आलं आहे. नवनीत राणा यांना जेलमध्ये खरंच त्रास दिला जातोय का? आणि त्रास दिला गेला किंवा त्यांची गैरसोय झाली का? याबाबतचा अहवाल आता राज्य सरकारला लोकसभा सचिवालयाला पाठवावा लागणार आहे. पण नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांना आता थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर उत्तर दिलं आहे. या व्हिडीओत नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दोघं पोलीस कस्टडीत चहा पिताना दिसत आहेत. व्हिडीओ बघितल्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांच्या ताब्यातअसतानाही चांगली वागणूक दिली गेल्याचं दिसत आहे.

संजय पांडे यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे?
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस ठाण्यातला सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राणा दाम्पत्य चहा पिताना दिसत आहेत. त्यामुळे आणखी काही सांगायची गरज आहे का? असा प्रश्न संजय पांडे यांनी व्हिडीओ शेअर करत उपस्थित केला आहे

राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी मिळणार की नाही ? ; गृहमंत्र्यांनी केले भाष्य... म्हणाले...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केली असून, त्यास भाजपाने पाठिंबा दिल्याने राज्यात वातावरण तापले आहे. मात्र सभेला प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिली नसल्याने संभ्रम कायम आहे. मनसे नेते मात्र मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यावर ठाम आहेत. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना याबाबत भाष्य केले आहे.राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी मिळणार की नाही याबाबत गृहमंत्र्यांनी भाष्य केले आहे. 

“सर्व पक्षांच्या बैठकीत सर्व चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांना जाहीर सभा घ्यायची असेल तर त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अधिकार आहे. याबाबत सरकार निर्णय घेणार नाही,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.
“औरंगाबाद येथील राज ठाकरे सभेबाबत एक दोन दिवसांत औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील. ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि पोलीस महासंचालकांसोबत चर्चा करत आहेत. परिस्थिती पाहून त्यासंदर्भातील निर्णय आयुक्त घेतील,” असे वळसे पाटील म्हणाले. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल, असा इशाराही दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. 

Monday, April 25, 2022

लहान वयातच मुलांना शाळेत पाठवू नये. त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो ; सर्वोच्य न्यायालय

वेध माझा ऑनलाइन -लहान वयातच मुलांना शाळेत पाठविण्याच्या मुद्द्याची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. मुलांच्या शालेय शिक्षणाबाबत पालकांच्या चिंतेवर सर्वोच्च न्यायालयाने ही भूमिका घेतली आहे. न्यायालय म्हणाले, लहान वयातच मुलांना त्यांच्या मानसिक आरोग्याच्या हितासाठी शाळेत पाठवू नये. मुलं दोन वर्षांची झाल्यावर शाळा सुरू करावी अशी पालकांची इच्छा असते, मात्र याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने यावर भाष्य केले आहे. आगामी शैक्षणिक सत्रासाठी केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षांच्या किमान वयाच्या निकषाला आव्हान देणाऱ्या पालकांच्या आवाहनावर खंडपीठाकडून सुनावणी सुरू होतो
"लहान वयातच मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती करू नका"
पालकांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या 11 एप्रिलच्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्यात असा दावा केला होता की, केंद्रीय विद्यालय संघटनेने मार्च 2022 मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या केवळ चार दिवस आधी, इयत्ता पहिली ते सहा वर्षे प्रवेशाचे निकष अचानक बदलले. पूर्वीचा नियम पाच वर्षांचा होता. यावर कोर्ट पुढे म्हणाले, मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय कोणते याचा अभ्यास करण्यात आला आहे. मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती करू नका, त्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

राज्यातील भारनियमन आटोक्यात ; महावितरणने केले प्रभावी नियोजन...

वेध माझा ऑनलाइन - कोळसा टंचाईमुळे देशभरातील अनेक राज्य वीजटंचाईचा सामना करीत आहेत, राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आजच्या आकडेवारी नुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, यांसारख्या राज्यात ९ ते १५ टक्क्यापर्यत वीजेची तुट असतांना महावितरणने केलेल्या प्रभावी नियोजनामुळे राज्यात ही तूट शुन्य टक्क्यापर्यंत म्हणजेच मागणी एवढा वीजपुरवठा करण्यात आला. त्यामुळे राज्यातील भारनियमन आटोक्यात आले असून महावितरणचे प्रभावी नियोजन यशस्वी होतांना दिसत आहे. परिणामत: मागील चार दिवसांत राज्यातील कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून वाढत्या तापमानात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.   

देशातील १० प्रमुख राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने वीजनिर्मितीला फटका बसला असल्याने इतर राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन केल्या जात आहे. राज्यातील जनतेला भारनियमनातून दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री ना.श्री.उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत सातत्याने बैठका घेऊन आवश्यक उपाययोजना वेगाने व ताबडतोब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने विजेची मागणी व उपलब्धता याचे प्रभावी नियोजन केल्यानेच राज्यात विजेच्या उपलब्धतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 
मागील आठवड्याभरात अदानी पॉवरने आपली उपलब्धता १७०० मेगावॅटवरुन ३०११ मेगावॅट, महानिर्मितीने ६८०० मेगावॅट वरुन ७५०० मेगावॅट याशिवाय एनटीपीसीने ४८०० मेगावॅटवरून ५२०० मेगावॅट पर्यंत विजेची उपलब्धता वाढविलेली आहे, याशिवाय महावितरणच्या सततच्या पाठपुराव्यामुळे साई वर्धा प्रकल्पातील वीज उत्पादन १४० मेगावॅटवरुन २४० मेगावॅटपर्यंत वाढविणे शक्य झाले आहे. सोबतच सीजीपीएलकडून करारीत ७६० मेगावॅटपैकी उर्वरित १३० मेगावॅट वीज पुरवठा २४ एप्रिलपासून सुरु झालेला आहे. तर एनटीपीसीच्या मौदा वीजनिर्मिती प्रकल्पातील बंद असलेला संच २५ एप्रिलपासून कार्यान्वित झाला आहे, त्यामधून २५० मेगावॅट इतका वीजपुरवठा सुरु झाला आहे. या सर्व नियोजनासोबतच, कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती करून व गरजेनुसार पावर एक्सचेंजमधून उपलब्ध असलेल्या दराने वीजखरेदी करून महावितरणद्वारे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येत आहे व यामुळे आज राज्यात  कुठेही भारनियमन करण्यात आलेले नाही.
सोमवारी सकाळी महावितरणची विजेची मागणी २३ हजार ८५० मेगावॅट होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३७९ मेगावॅट, केंद्राकडून ५७३० मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पामधून २१८ मेगावॅट, अदानीकडून ३०११ मेगावॅट, आरपीएलकडून १२०० मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून ४० मेगावॅट, साई वर्धाकडून २४० मेगावॅट सोबतच बाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून ११८७ मेगावॅट, राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १३१४ मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पांकडून २३९ मेगावॅट, सहवीज निर्मिती प्रकल्पांतून ९७७ मेगावॅट, लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून २२४ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून महावितरणने सर्वच वीजवाहिन्यांवर अखंडित वीजपुरवठा केला आहे तसेच कृषिपंपाना वेळापत्रकानुसार सुरळीत वीजपुरवठा करण्यात येत आहे. अखंडित वीजपुरवठ्याची हीच परिस्थिती सोमवारी देखील कायम होती. त्यामुळे राज्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या वीज परिस्थिती अनुकूल झाली असली तरी महावितरणकडून प्रभावी नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हास्तरावरील वॉर रुमच्या माध्यमातून तासागणिक आढावा घेण्याचे काम सुरु आहे.

Sunday, April 24, 2022

यात्रेकरू भाविकांवर मधमाशांचा हल्ला ; त्यावेळी जीव वाचवण्यासाठी पळताना युवकाचा दरीत पडून मृत्यू ; या घटनेने सातारा तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात खळबळ...

वेध माझा ऑनलाइन - यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला झाला त्यावेळी जीव वाचवण्यासाठी पळताना तारळे येथील युवकाचा दरीत पडून मृत्यू झाला शिवाजीनगर येथील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे

सातारा तालुक्यातील शिवाजीनगर गावच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केला यावेळी जीव वाचवण्यासाठी पळताना एक युवक दरीमध्ये कोसळण्याची दुर्घटना घडली यामध्ये या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सोमेश्वर विलास कदम वय 13 राहणार तारळे असे सदर मुलाचे नाव आहे शिवाजीनगर गावच्या यात्रेनिमित्त भाविक दर्शनासाठी डोंगरावर असलेल्या खंडोबा मंदिरात गेले होते यावेळी झाडावरील मधमाश्यांनी हल्ला चढवल्याने एकच तारांबळ उडाली जीव वाचवण्यासाठी भाविक इकडे तिकडे धावू लागले यावेळी धावत असताना मृत्त सोमेश्वर कदम दरीत कोसळला बचावकार्य करून या युवकाला दरीतून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्याचा मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे... या मधमाशांच्या हल्ल्यात मध्ये दहाच्या वर भाविक जखमी झाले आहेत

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान...ह्रदयनाथ मंगेशकरांची कार्यक्रमास गैरहजरी...

वेध माझा ऑनलाइन - मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाला ह्रदयनाथ मंगेशकर गैरहजर होते. या कार्यक्रमाला इतर
मंगेशकर कुटुंबीय सदस्य हजर होते.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला. आज हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला यावेळी व्यासपीठावर आशा भोसले, मिनाताई खाडीलकर, आदिनाथ मंगेशकर उपस्थित होते. यांच्या हस्तेच हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला.
दरम्यान,  या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. राज्य सरकारच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सुभाष देसाई हजर होते. तर भाजपचे नेते  देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला हजर होते.

आज सातारा जिल्ह्यात शून्य पेशंट ; मात्र राज्यातील स्थिती जरूर पहा...

वेध माझा ऑनलाइन -  मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. रविवारी राज्यात 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 194 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. राज्यात काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मागील 24 तासांत 95 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,28,091 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11% एवढे झाले आहे. दरम्यान सातारा 
जिल्हा आज कोरोनामुक्त आहे जिल्ह्यात आज शून्य पेशंट आहेत

दरम्यान,राज्यात आज दोन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यात सध्या 916 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये सध्या 521 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 205 सक्रीय रुग्ण आहेत. रायगड 20, ठाणे 80, नाशिक 10, अहमदनगर 18, धुळे 24 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 च्या आतमध्ये आहे. 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी 144 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबई आणि उपनगरात 73 नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबई सर्कलमध्ये एकूण 90 कोरोना रुग्ण आढळले आहेत. नाशिक सर्कलमध्ये 13, पुणे सर्कलमध्ये 31, कोल्हापूर सर्कलमध्ये तीन,  औरंगाबाद सर्कलमध्ये दोन,  लातूर सर्कलमध्ये दोन, अकोला सर्कलमध्ये एक आणि नागपूर सर्कलमध्ये दोन नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. 

देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवे कोरोनाबाधित - 
देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 1755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही ; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज ; नारायण राणे

वेध माझा ऑनलाइन - सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे. दरम्यान, राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. खून होत आहेत. दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येणे गरजेचं आहे, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे.  

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेचच जामीनासाठी अर्ज केला. मात्र या प्रकरणाची सुनावणी न्यायालयानं २९ एप्रिलला ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आता रवी राणांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात, तर नवनीत राणांची रवानगी भायखळा तुरुंगात केली जाईल.
राणा दाम्पत्यावर केलेल्या कारवाईवर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे. देशात लोकशाही आहे. कोणी हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येत असेल, तर विरोध का, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहिती नाही. ८९ हजार कोटींचा तूट आहे. राज्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा, असा प्रकार राज्यात सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला मागे नेल्याची टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे.
पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नाही. खून होत आहेत. दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येणे गरजेचं आहे, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे.

अगोदर दंगल घडवायची ;मग,राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याचे षडयंत्र सुरू - संजय राऊत

वेध माझा ऑनलाइन - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी  सुनावण्यात आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे भाजपला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे. त्यासाठी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भाजपकडून वेगवेगळ्या माध्यमातून तशाप्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पण राज्य सरकारकडून त्यांचा प्रयत्न उधळला जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?
"हे एक मोठं षडयंत्र आहे. सदावर्ते प्रकरणात सुद्धा हेच झालं आहे. राज्य उलथवायचं, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करायचा. नेत्यांच्या घरावर हल्ले करायचे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरावर प्रयत्न केला. मग शिवसैनिक प्रतिकार करतात. मग संघर्ष निर्माण करायचा. त्यातून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करायची. त्यांच्या मनाप्रमाणे एकदा घडलं की राज्यपाल त्यांचंच आहे. राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची. हे असे सगळे उद्योग सुरु आहेत. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे राज्य पुढे नेत आहेत. त्यामुळे भाजपचा प्रत्येक कट उधळला जातोय", असा दावा संजय राऊतांनी केला.

राणा दाम्पत्याने आता जेलमध्ये वाचावी हनुमान चालीसा...संजय राऊतांनी लगावला टोला...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. इथे प्रत्येक कारवाई कायद्यानं होते, असं म्हणत संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. जर कोणी लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीनं अशी कारस्थानं करत असेल, तर त्यांच्यावर नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होतो, असं ते म्हणाले. तसेच, पुढे बोलताना मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील, राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, आता राणा दाम्पत्याना जेलमध्ये पाठवलंय. तिथे त्यांनी वाचावी हनुमान चालिसा. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन वाचावी, एखादं मोठं सभागृह घ्यावं तिथे त्यांनी वाचावं. या महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक हिंदुंच्या कार्यक्रमाला कोणीच विरोध केलेला नाही. पण तुमचा जो हट्ट आहे, मी मातोश्रीत घुसून वाचेल, तुम्ही घुसून वाचणार मग आम्हीही घुसू. तुमच्या बापाचं राज्य आहे का?", असंही राऊत म्हणाले. 



शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "हा न्यायालयाचा निर्णय. याच्याशी सरकारचा संबंध नाही. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. इथे प्रत्येक कारवाई कायद्यानं होत आहे. काल किंवा अलिकडच्या काळात पोलिसांनी जे चित्र पाहिलं. राणा दाम्पत्याच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील, राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे, कारस्थान आहे. त्यांच्यावर पोलिसांनी लावलेली कमल योग्य आहेत असं मला वाटतं. अशा प्रकारे राज्य उठवण्याचा कट धर्माच्या नावावर महाराष्ट्रात नाही, तर कुठेही होऊ नये. पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा अन्य राज्य असतील, अशाप्रकारे जर कोणी लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीनं अशी कारस्थानं करत असेल, तर त्यांच्यावर नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होतो. हे काही आज होत नाही. भीमा-कोरोगावमध्ये अनेक विचारवंत, लेखक, कवी यांना अटक करुन राज्य उठल्याचा कट त्यांच्यावर मागच्या सरकारनं लावला आहे. त्यामुळे त्यांनी आता आम्हाला शिकवू नये. हे मोठं षडयंत्र आहे."
"सदावर्ते प्रकरणातही हेच झालंय. राज्य उठवायचं, राज्य अस्थिर करायचं. तिथे पवारसाहेबांच्या घरी ते गेले, इथे मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न ते करत होते. पोलीस आहेत ठिक आहे, पण शिवसैनिक प्रतिकार करतात. मग संघर्ष निर्माण करायचा, त्यानंतर दंगल सदृश परिस्थिती निर्माण करायची. एकदा मनाप्रमाणे घडलं की, राज्यपाल त्यांचेच आहेत. मग राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी करायची, असा प्रकार सुरु आहे.", असं संजय राऊत म्हणाले. 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते असतील, हे सगळे हे राज्य सक्षमपणे पुढे नेत आहेत. त्यामुळे यांचा प्रत्येक कट उधळला जात आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "हनुमान चालिसाला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाहीये. हनुमान चालिसाला कोणी विरोध केला? काल ते जेलमध्ये होते, तिथे वाचू शकतात. आता त्यांना कुठल्यातरी जेलमध्ये पाठवलंय. तिथे त्यांनी वाचावी हनुमान चालिसा. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन वाचावी, एखादं मोठं सभागृह घ्यावं तिथे त्यांनी वाचावं. या महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक हिंदुंच्या कार्यक्रमाला कोणीच विरोध केलेला नाही. पण तुमचा जो हट्ट आहे, मी मातोश्रीत घुसून वाचेल, तुम्ही घुसून वाचणार मग आम्हीही घुसू. तुमच्या बापाचं राज्य आहे का?", असं राऊत म्हणाले. 


राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयिन कोठडीत...

वेध माझा ऑनलाइन - सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे.

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेचच जामीनासाठी अर्ज केला. मात्र या प्रकरणाची सुनावणी न्यायालयानं २९ एप्रिलला ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आता रवी राणांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात, तर नवनीत राणांची रवानगी भायखळा तुरुंगात केली जाईल.

Saturday, April 23, 2022

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांची जोरदार दगडफेक ; गाडी फोडली!

वेध माझा ऑनलाइन - भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. तर सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. 

किरीट सोमय्या आज रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे. यापूर्वीही अशाप्रकारे त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली आहे.

सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती. असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.

Friday, April 22, 2022

कराडमधील समस्त ब्राह्मण समाजाकडून राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी यांचा निषेध ; कारवाईची मागणी

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यानी ब्राम्हण समाजाबाबत   केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्था व कराड मधील सर्व ब्राह्मण संघटना यांनी एकत्र येऊन मिटकरी यांच्यावर गून्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसात निवेदनाद्वारे केली  आहे.

यावेळी सर्व ब्राह्मण संघटना व त्यांचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंत बेडेकर, ओंकार आपटे, प्रशांत कुलकर्णी, अरुण प्रभुणे, विकास देशपांडे, सौ विनिता पेंढारकर, मुकुंद चरेगावकर मल्हारी उमराणी, माधव गिजरे, संदीप भागवत , शरद हरदास, श्रीकांत ढवळे, राजाभाऊ जाखलेकर यांचेसह विक्रम पावसकर  उपस्थित होते. या निवेदनावर समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्था कराड, चित्तपावन ब्राह्मण संघ कराड, बहुभाषिक ब्राह्मण संघ, आगशिवनगर, बहुभाषिक ब्राह्मण संघ, विद्यानगर, ब्राह्मण बहुउद्देशीय चॅरिटेबल फौंडेशन श्र्संहिता स्वाहाकार समिती,वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळाचे सदस्य यांच्या सह्या आहेत

दरम्यान, या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व आ. अमोल मिटकरी यांनी दिनांक १९ एप्रिल २०२२ या दिवशी सांगली येथील पक्षाच्या जाहीर सभेत मा. ना. जयंत पाटील,ना. धनंजय मुंडे यांचेसह असंख्य लोकांचे उपस्थितीत जाहीरपणे वक्तव्य करताना हिन्दू धर्मियांचे श्रध्दा स्थान असलेल्या रामभक्त हनुमान स्तोत्र म्हणताना मारुती स्तोत्र व हनुमान चालिसा याचे मिश्रित अभद्र भाषेत टिका टिप्पणी करताना हिन्दू देवतेचा व श्रध्देचा जाणीवपूर्वक अवमान करुन जाती धर्मात तेढ वाढवून वितुष्ट निर्माण केले आहे.
याशिवाय  या महाशयांनी परंपरागत हिन्दू विवाह पध्दतीवर टीका करताना " कन्यादान " या हिन्दू संस्कार पध्दतीवर गलिच्छ व द्वेषमूलक टीका केली आहे. हिन्दू धर्म पध्दती प्रमाणे मुलीचे वडील मुलाचे वडिलांकडे कन्यादान करुन मुलीचा सांभाळ करण्याचे सांगतात पण या महाशयांनी या हिंदू धर्मातील संस्काराचे विधीवर खोटी व गलिच्छ बेताल टीका करुन हिन्दू धर्मिया मध्ये तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केलेले आहे. वास्तविक या कोणत्याही विधीशिवायही प्रेम विवाह होतच असतात पण हिन्दू धर्मियांचे संस्काराबद्दल बेताल व गलिच्छ टीका करुन हिन्दू धर्मियांच्या भावना दुखवून   ठेच पोहचविली आहे. व जाणीवपूर्वक  तेढ निर्माण केली आहे. कोणत्याही विवाह प्रसंगी " मम भार्या समर्पित " असे वाक्य कोणताही पुरोहित वा ब्राह्मण कोणत्याही विवाह प्रसंगी उच्चारत नाहीत. पण या महाशयांनी स्वतः हे ऐकल्याचे व नवर देवाला कानात सांगितल्याचे मोघमपणे जाहीर वक्तव्य  केले. पण हे कोणत्या मित्राचे लग्नात कोणत्या गांवात कोणत्या पुरोहित, ब्राह्मण वा महाराजानी असे म्हणले याविषयी कांहीही न सांगता मोघमपणे समाजात तेढ वाढविण्यासाठीच फक्त हे वक्तव्य केले आहे हे यावरुन स्पष्ट होत आहे.
या सभेत ना. जयंत पाटील,ना. धनंजय मुंडे हे महाराष्ट्र राज्यातील शासनातील मंत्री महोदयांनी हजर असतानाही निषेध केलेला नाही वा कारवाई करण्याचे आदेश दिलेले नाहीत. उलट या वक्तव्यास हसून दाद दिलेली आहे. म्हणजेच या शासन प्रतिनिधीचा या हिन्दू धर्मात तेढ निर्माण करण्यास सहमती आहे. हे स्पष्ट दिसून येत आहे. आपणास विनंती कि, या सांगली येथील भाषणाची विविध फेसबूक वा व्हाॅट्सअप ग्रूपवर आलेली व्हिडिओ क्लिप संबंधीत पोलीस स्टेशनकडून तपासून घेवून संबंधीत अमोल मिटकरी, व सदर सभा आयोजक आणि सदर सभेत हजर राहून कोणतिही कारवाई न करता या तेढ निर्माण करणा-या वक्तव्यास दाद देणा-या शासन प्रतिनिधी जयंत पाटील व धनंजय मुंडे यांचे विरुध्द भारतीय दंड संहितेनुसार उचित कारवाई त्वरीत करावी.समाजात तेढ निर्माण करणारावर तातडीने कारवाई केली जावी हीच नम्र विनंती.असेही या निवेदनात म्हटले आहे

सुप्रियाताईनी पत्रकारांशी संवाद साधला, मात्र विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे न देताच त्या निघून गेल्या...


वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीच्या  खासदार सुप्रियाताई सुळे आज कराडमध्ये आल्या होत्या येथील स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्या येथील माध्यमांशी बोलण्यासाठी आल्या त्यांनी राज्याच्या  महत्वाच्या विषयावरील प्रश्नांची समर्पक उत्तरे देणे पत्रकारांना अपेक्षित असताना केवळ गोलमोल उत्तरे देऊन त्या निघून गेल्या...

आज सुप्रिया सुळे कराडच्या प्रीतिसंगम घाट येथे स्व चव्हाण साहेबांच्या समधीस्थळावर आल्या होत्या... तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांच्याकडून माध्यमांना राज्यात चाललेल्या एकूणच चालू घडामोडीविषयी रास्त उत्तरे अपेक्षित होती मात्र पत्रकारांचा याबाबतीत हीरमोड झाला... त्यांनी गोलगोल आणि संदर्भहीन चर्चा करत ही पत्रकार परिषद गुंडालण्याचा प्रयत्न केल्याचे पत्रकारांना यावेळी जाणवले...

पत्रकारांनी खासदार सुळे याना आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची टिंगल केली...हिंदू समाजातील कन्यादान या धार्मिक विधीची थट्टा केली याबाबत मत विचारले असता... त्यांनी विषय बदलून महागाईवर लेक्चर द्यायला सुरुवात केली...महागाई एवढी झाली आहे असल्या चर्चा व असल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही... महागाईचा प्रश्न मोठा आहे असे त्या प्रश्नाशी काही संबंध नसणारे निरर्थक उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचे पत्रकारांच्या लक्षात आले... 

लेखक जेम्स लेन यांनी नुकतीच एका माध्यम 
समूहाला मुलाखत दिली... त्यात त्यांनी इतिहास तज्ञ दिवंगत लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी  आपण लिहिलेल्या पुस्तकाविषयी कसलीच चर्चा केली नव्हती अशी स्पष्टोक्ती दिली...याविषयावरून खासदार सुळे याना पुरंदरेंना आपल्या पक्षाकडून सॉफ्ट टार्गेट केले गेले या राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य आहे असे म्हणायचे का ? असे विचारताच त्यांनी पवार साहेब हे अनेकदा देवळात देवाला गेल्याचा एक दाखला देत पुन्हा वाढलेल्या महागाईची चर्चा केली...आणि  विचारलेल्या प्रश्नाला व्यवस्थित बगल दिली... याही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेच नाही...मात्र, वकील सदावरते व राज ठाकरे यांच्या एकूणच राष्ट्रवादीवर व पवार साहेबांवर होणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना त्यांनी या दोघांचे संस्कार काढले... 

जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी अंतर्गत राजकारण झाल्याची टीका त्यांनी स्वतः केली होती... त्यावर पक्ष काय ऍक्शन घेणार...या  प्रश्नाविषयी त्यांनी शशिकांत शिंदेंसमोरच प्रॉपर उत्तर देणे अपेक्षित असताना  गुळगुळीत उत्तर देत शिंदे यांनी पुन्हा जोमाने पक्षाचे काम करायचे आहे असे सांगितले...मात्र शिंदेंवर झालेल्या पक्षांतर्गत राजकारणाविषयी उत्तर देणे टाळले...हे स्वतः शशिकांत शिंदे यांच्याही लक्षात त्यावेळी आले... 

पती सदानंद सुळे याना ईडीची नाही तर इन्कमटेक्स ची नोटीस आली आहे मात्र काळजी नको... मै लढ लुंगी...असे म्हणत त्यांनी  पत्रकारांशी चाललेला हा संवाद थांबवला...
एकूणच पत्रकारांनी विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाचे त्यांनी समर्पक उत्तर न देता काहीही विचारले तरी तो विषय महागाईवर नेऊन ठेवत  वेळ मारून नेली आणि ही पत्रकार परिषद त्यांनी गुंडाळली, नंतर पुढील प्रवासास त्या निघून गेल्या...



राज्यातील आगामी नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील ; शशिकांत शिंदे यांनी केलं स्पष्ट...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील आगामी नगरपालिका निवडणूक या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील असा विश्वास आहे. दुर्दैवाने त्यात काही अपयश आले, तर मात्र स्वतंत्रपणे पक्ष निवडणूक लढवतील असे राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांनी आज दुपारी प्रीतिसंगम घाट येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले

ते म्हणाले ,कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आज कमकूवत असली तरी भविष्य काळामध्ये मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. येथील कट्टर कार्यकर्त्यांना चांगले बळ देऊन कराड दक्षिणेत राष्ट्रवादी मजबूत करू, असा विश्वास माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. 
 खरतर राज्य करणाऱ्यांना विकास कामावर बोलण्याची आज गरज आहे. पण राज्यात सध्या आरे ला कारे करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या समाजाची टिंगल करते असं म्हणणं योग्य होणार नाही. पण दुर्दैवाने आज राजकारणाची पातळी घसरत असून ते हिताचे नाही.
किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक आज तेथील सभासदांना हातात घेतली असून त्यांना परिवर्तन हवे आहे. आपला ऊस गेला पाहिजे, त्याला भाव चांगला मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही नक्कीच परिवर्तन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Thursday, April 21, 2022

यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांना पुत्रप्राप्ती...यादव कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण...

वेध माझा ऑनलाइन - येथील पालिकेचे गटनेते व यशवन्त विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव याना आज दुपारी पुत्रप्राप्ती झाली हीी माहिती त्यांचे बंधू विजय यादव यांनी दिली

राजेंद्रसिंह यादव यांचा मागील वर्षीच विवाह झाला होता आज त्यांना पुत्रप्राप्ती झाल्याने यादव कुटुंबियांमध्ये आनंदाचे व उल्हासाचे वातावरण आहे
राजेंद्र यादव हे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून लोकांना परिचित आहेत मात्र ते कुटुंब वत्सल म्हणून संवेदनशील देखील आहेत हे त्यांच्या जवळ जाण्याने नक्कीच समजते
त्यांचे सामाजिक भान जेवढे सत्वर आहे तेवढेच कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून ते तितकेच जागृत आहेत 
आज त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे त्यांच्या कुटुंबियांसह त्यांचे निकटवर्तीय व मित्रपरिवार देखील या बातमीने आनंदाने न्हाऊन निघाला आहे

आता पडणार पाऊस ; वाहणार वेगवान वारे...हवामान खात्याचा अंदाज ; कुठे कुठे पडणार पाऊस ? वाचा सविस्तर

वेध माझा ऑनलाइन - राज्यात तापमानाने प्रचंड उच्चांक गाठला आहे. मार्च महिन्यात तर अंगाची अक्षरश: लाही लाही व्हावी इतकं ऊन पडलं. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अक्षरश: 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये आजही उष्णतेची लाट आहे. तापमानाचा हा पारा मे महिन्यात आणखी किती चटके देणार हे येणाऱ्या काळात आपल्याला अनुभवायला मिळेलच. पण हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. पावसामुळे गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा गारवाचा विसावा मिळेल. पण या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये तुरळक, तर काही ठिकाणी वादळी, वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 एप्रिल आणि 22 एप्रिल या दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी काही ठिकाणी 23 एप्रिलला देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर 24 आणि 25 एप्रिल रोजी आकाश निरभ्र राहणार आहे. त्यावेळी कदाचित आपल्याला ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागतील. विशेष म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण आहे. याशिवाय थंड वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. ऊन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशाप्रकारचा गारवा मिळत असल्याने त्या परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. पण ग्रामीण भागांमध्ये अशा वातावरणाता नागरिकांना फटका बसू शकतो. कारण शेतीचं नुकसान होऊ शकतं.



MHT CET ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे ; उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत  आहे ट्विट करून दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये JEE ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यात नीट परीक्षेचं वेळापत्रकही  याच परीक्षेच्या काळात होतं. म्हणूनच काही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

MHT CET 2022 च्या वेळापत्रकातील बदलाबाबत अफवा आणि अटकळ पसरत असताना, उदय सामंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter वर MHT CET 2022 च्या परीक्षेच्या तारखांमध्ये झालेल्या बदलाबद्दलचा निर्णय जाहीर केला. “जेईई आणि एनईईटी परीक्षांमुळे सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.” असं ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊ नये म्हणून जहरो विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात पुण्यात ब्राह्मण महासभेचे आंदोलन ;

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेले ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महा सभेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलनकर्ते जमले असून अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गुरुजींच्या वेशात आलेले कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

दरम्यान या आंदोलनामध्ये ब्राह्मण महासंघाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झालेली पाहायला मिळाली.ब्राह्मण  महासंघाचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला या वेळेस मोठा गोंधळ उडालेला पाहिला मिळाला. यावेळी काही गोंधळ होऊ नये म्हणून मोठा फौजफाटा देखील पाहायला मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाकडून करण्यात येतोय. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपले विकट हास्य आवरले नाही. हा व्हीडिओ राज्यात व्हायरल झाला आहे

 

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार ; अटकपूर्व जामीनासाठी पळापळ सुरू...

वेध माझा ऑनलाइन- भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अशातच गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. गणेश नाईकांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी आहे. त्यामुळे गणेश नाईकांना दिलासा मिळणार की, अटक होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सध्या गणेश नाईक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दीपा चौहान यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना दीपा चौहान म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या बरोबर आपले गेल्या 27 वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये आहे. या प्रेमसंबंधातून 15 वर्षाचा मुलगा झाला असून त्याला गणेश नाईक यांनी वडीलांचे नाव द्यावे, अशी मागणी दीपा चौहान यांनी केली आहे. गणेश नाईक यासाठी नकार देत असल्याने थेट पोलीस ठाणे गाठत दीपा चौहान यांनी गणेश नाईकांवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी दीपा चौहान यांनी महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली असून वेळ पडल्यास कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून आपली गणेश नाईक यांच्या बरोबर भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मुलाबरोबर सुरू असलेले बोलणे ही गणेश नाईक यांनी बंद केल्याचेही दीपा चौहान यांनी सांगितलं आहे.

Wednesday, April 20, 2022

कराडच्या गब्बर ग्रुपला रोटरी क्लबचा मानाचा "कराड रोटरी अवार्ड' जाहीर ; गब्बर ग्रुपचे सर्वत्र होतय अभिनंदन...

वेध माझा ऑनलाइन - येथील सामाजिक कार्य करणाऱ्या गब्बर ग्रुपला कराड रोटरी क्लबचा मानाचा व प्रतिष्ठेचा सामाजिक विभागातून दिला जाणारा यावर्षीचा कराड रोटरी अवार्ड  2021 - 2022 पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे 

कराड येथील सामाजिक कार्यात अववल असलेला गब्बर ग्रुप आहे कोविड काळापासून ते शहरात पूर परिस्थिती असो किंवा कोणतेही जनहीताचे सामाजिक कार्य असो या ग्रुप ने पुढे होऊन ते कार्य तडीस नेत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आवर्जून या ग्रुपचे खुलेआम कौतुकही केले आहे
कराडच्या रोटरी क्लबने या ग्रुपच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्याची दखल घेत या ग्रुपला यावर्षीचा सामाजिक विभागातून दिला जाणारा कराड रोटरी अवार्ड हा पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे

रोटरी क्लब ऑफ कराड यांचेकडून पुरस्कार मिळणे आपल्यासाठी खरच अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल या ग्रुपचे अडमीन राहुल चव्हाण यांनी रोटरी क्लब ऑफ कराडचे आभार मानले आहेत आपल्या आजवरच्या समाजकार्याची ही पोचपावती असून आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या साथीने आपल्या गब्बर ग्रुप चे नाव आज एवढ्या उंचीवर पोहोचले आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे दिनांक 26 रोजी अरबन बँकेच्या शताब्दी हॉल याठिकाणी सन्मानपूर्वक या ग्रुपला हा पुरस्कार दिला जाणार आहे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन ग्रुपचे अडमीन राहुल चव्हाण यांनी केले आहे

दिल्लीत कोरोनाचा पुन्हा विस्फोट ; एका दिवसात किती रुग्ण वाढले पहा...

वेध माझा ऑनलाइन - देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकट ओसरल्याचं चित्र होतं. पण आता कोरोनाने पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येचा आज विस्फोट होताना दिसत आहे. कारण दिल्लीत गेल्या 24 तासात तब्बल 1009 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. चीनमध्ये सध्या स्थितीत कोरोना संकटाची भीषण परिस्थिती असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. तिथे लॉकडाऊननंतरही कोरोना नियंत्रणात येत नसल्याच्याही चर्चा सध्या सुरु आहे. पण देशात सध्याच्या घडीला तशी परिस्थिती नाही. तरीही एकाच दिवसात दिल्लीत तब्बल 1009 रुग्णांची वाढ होणं ही चिंतेची बाब आहे.

कोरोनाचा ओमायक्रोन हा विषाणू जास्त संसर्गजन्य आहे. त्याचा संसर्ग होण्याचा वेग प्रचंड जास्त आहे. त्यामुळे याच विषाणूची ही साथ असल्याचा अंदाज आहे. कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता घाबरुन जाण्याची गरज नाही. पण काळजी घेण्याची प्रचंड आवश्यकता आहे. याआधी कोरोनाच्या तीन लाटांना आपण थोपवलं आहे. त्यामुळे ही लाटही निघून जाईल. कोरोना संकट नाहीसं होईल, अशी आशा बाळगूया. दरम्यान, दिल्लीत वाढती कोरोनाची रुग्णसंख्या पाहत मास्क सक्ती करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मास्कसक्ती करण्यात आली असून जो मास्कचा वापर करणार नाही त्याल 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. आता हे संकट किती दिवसांनी निवळेल हे आता येणाऱ्या काळात दिसेल. पण काळजी घेतलं तर हे संकट लवकर निवळण्याची शक्यता आहे.
दिल्लीत सध्या कोरोनाचा सकारात्मकता दर हा 5.70 टक्के इतका आहे. दिवसभरात 1009 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 54 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. तर इतर रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तसेच दिल्लीत आज दिवसभरात 314 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची नोंद झाली आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता आजूबाजूच्या राज्यांमध्येही त्याचे पडसाद पडू लागले आहेत. दिल्लीत रुग्णवाढ झाल्यानंतर हरियाणा सरकारने दिल्ली सीमालगतच्या चार राज्यांमध्ये मास्कची सक्ती केली आहे. गुरुग्राम, फरीदाबाद, सोनीपत, झज्जर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

मुंबईत 72 टक्के भोंगे बंद ! - पोलीस सूत्रांची माहिती

वेध माझा ऑनलाइन - मुंबईत 72 टक्क्यांवरील मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज कमी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर सकाळची अजाण वेळी मुंबईतली 72 टक्के मशिदींवरील भोंगे बंद असतात, अशीही माहिती समोर आली आहे. तर बहुतांश मशिदींकडून भोंग्यांचा वापर बंद असल्याचीही माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.


 मुंबई पोलिसांनी सर्व समाजाच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्याचीही माहिती दिली आहे.  या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मुद्द्यांबद्दल आणि त्याचे पालन करण्याबद्दल समजावून सांगण्यात आले. धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरसाठी पुढील परवानगी संरचनेची सत्यता पाहण्यासाठी आणि ती सायलेंट झोनमध्ये आहे की नाही हे पाहण्याची परवानगी दिली जाणार आहे. मुंबई पोलिसांकडे परवानगीसाठी लोकांकडून अर्ज याला सुरुवात झाली आहे.
तर दुसरीकडे नांदेमधील बारड गावानं 2018 मध्येच सर्वानुमते सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले आहेत. भोंग्यांच्या या वादात बारड हे गाव आदर्श ठरलय,कारण ह्या गावाने आज पासून पाच वर्षापूर्वीच म्हणजे 31 जानेवारी 2018 सालीच ह्या गावातील सर्वधर्मीयांच्या निर्णयाने गावातील सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे बंद केले आहेत.
भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय, राज्यभर भोंग्यांसंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती गृहखात्यातील सूत्रांनी दिली.

राज्यात वीज टंचाई ; भारनियमन होणार!

वेध माझा ऑनलाइन - राज्यात वीज टंचाईमुळं भारनियमनाचं संकट गडद होत आहे. कोळसा टंचाईच्या समस्येमुळे महावितरण कंपन्यांवर मोठं संकट उभं ठाकलं आहे. वीजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जा विभागाला निर्देश दिले आहेत. विजेच्या समस्येबाबत उर्जा विभागाने दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी  लक्षात घेऊन ८ हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी उर्जा विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उर्जा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत त्यांनी राज्याची् सध्याची वीज निर्मिती, कोळशाचा साठा, वीजेची वाढती मागणी या समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत आढावा घेतला. या बैठकीला उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, माजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Tuesday, April 19, 2022

कट्टर शिवसैनिक संजय मोहिते यांचे निधन...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख संजय मोहिते यांचे आज सकाळी ह्रदयविकाराने निधन झाले. मागील काही दिवसामध्ये सेनेचे उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक यांचे निधन झाले ही बातमी अद्याप ताजी असतानाच मोहिते यांच्या निधनाने शिवसेना पोरकी झाल्याची भावना जिल्ह्यातून व्यक्त होतेय राज्याचे नगरविकासमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे ते जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे 

राज ठाकरेंना येतायत धमकीचे फोन ; बाळा नांदगावकर यांनी दिली माहिती

वेध माझा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदींवर भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मनसेच्या या भूमिकेवर काही मुस्लिम संघटना नाराज आहेत. विशेष म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने तर 'छडोगे ते छोडेंगे नहीं' अशी धमकीच दिली आहे. याशिवाय राज ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याची माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. राज ठाकरे यांना त्यांच्या मिशिदींवरील भोंगे काढण्याच्या भूमिकेवरुन अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तसेत राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. याशिवाय येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत बैठकीत नेमकं काय-काय घडलं याबाबतची माहिती दिली.

राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्या सभेची सर्व तयारी झाली आहे. तसेच राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी देखील सर्व तयारी करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्ते अक्षय तृतीयाला पोलिसांची परवानगी घेऊन हनुमान चालीसा पठण करणार आहेत. राज ठाकरेंनी अक्षय तृतीयाला महापूजा करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांना मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन धमकीच फोन येत आहेत. त्या मुद्द्यावर नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न काही पत्रकारांनी विचारला तेव्हा बाळा नांदगावकर यांनी या प्रकरणी आपण राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. पण त्यावर आतापर्यंत काहीच उत्तर आलेलं नाही. आता आपण पुन्हा राज्य आणि केंद्रीय गृहमंत्री दोघांना राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्याबाबत पत्र लिहिलं आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात पत्र पाठवलं होतं. त्याबाबतची माहिती आज राज ठाकरेंना देण्यात आली, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत राज ठाकरे यांचा सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबादमधील मैदानाची आपण रेकी केली असून त्यानुसार नियोजन केलं जात असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वे बुक करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी पत्र पाठवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Monday, April 18, 2022

पृथ्वीराजबाबा व पालकमंत्र्यांनी केले एकमेकांच्या कार्याचे कौतुक...तर, श्रीनिवास पाटील म्हणाले... आम्ही तिघे म्हणजे महाआघाडी...काय आहे बातमी वाचा...


वेध माझा ऑनलाइन - येथील प्रीतिसंगम घाट येथे नुकतेेच पोलीस चौकीचे उदघाटन झाले यावेळी आमदार पृथ्वीराजबाबांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले तर...पालकमंत्र्यांनी पृथ्वीराज बाबांच्या कार्याची वाहवा केल्याचे पहायला मिळाले...खासदार श्रीनिवास पाटील हे याचवेळी आपल्या भाषणात आम्ही तिघे म्हणजे महाआघाडी आहोत... असे एका विषयाचा संदर्भ सांगताना म्हणाले...  एकूण च या पोलीस चौकीच्या उद्घाटन प्रसंगाचे औचित्य सााधून होणाऱ्या येथील पालिका निवडणुकीत हे दोन्ही आमदार महाआघाडी म्हणून एकत्र येणार असल्याचे संकेतच त्यानी यावेळी दिले अशी चर्चा सुरू झाली आहे

काल सोंमवारपासून येथील प्रीतिसंगम घाट परिसरात पोलीस चौकी कार्यरत झाली आहे... याठिकाणी पोलीस चौकी व्हावी अशी मागणी बरेच दिवस जोर धरून होती... पालिकेचे मुख्याधिकारी डाके यांनी या मागणीला उचलून धरत येथील पोलीस स्टेशनचे अधिकारी बी आर पाटील यांच्या सहकार्याने पोलीस चौकी तेथे उभी केली... त्याचे उदघाटन करण्यासाठी कराड दक्षिण, व उत्तरचे असे दोन्ही आमदार उपस्थित होते... खासदार श्रीनिवास पाटील यावेळी आवर्जून उपस्थित होते... औपचारिक उदघाटन झाल्यावर दोन्ही आमदारांनी आपल्या भाषणात एकमेकांवर एकमेकांच्या कार्याबद्दल कौतुक करत स्तुतीसुमने उधळली... माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या  राहण्याची सोय करण्याच्या ड्रीष्टिकोनातून बांधलेले येथील पोलिसांचे संकुल ही साकारलेली सुंदर संकल्पना असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले, तर  पालकमंत्र्यांनी विशेष प्रयत्नांनी पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर गाड्यां उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात पोलिसांना सर्वत्र उपलब्ध राहून कमी वेळात जास्त काम करणे सोपे जाईल असे सांगत पृथ्वीराज बाबांनी पालकमंत्र्यांचे कौतुक केले... तसेच इतर कामाचाही उडत उडत बोलता-बोलता या प्रत्येकाने पाढा वाचत एकूण आतापर्यंत केलेले काम लोकांपर्यंत पोचवले...याचवेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील "संगम' या शब्दाच्या रेफरन्स ने आमच्या तिघांचा संगम आहे... आम्ही तिघे महाआघाडी आहोत असे सांगत... या उदघाटन प्रसंगी आम्ही भविष्यात होणाऱ्या निवडणुका एकत्र लढणार आहोत असेच एकप्रकारे सुचवले...या कार्यक्रमाला भाजप चे नगरसेवक कार्यकर्ते देखील आवर्जून उपस्थित होते... पत्रकारही हजर होते... याचमुळे सर्वांना हा मेसेज जावा या कारणाने खासदार पाटील यांनी यावेळी वरील संकेत दिले... तसेच पोलिसांना काही अडचण असेल तर आम्ही तिघे आहोत काहीही काम सांगा... असे म्हणत दोन आमदारांसाह आपली राजकीय "वीण' एकत्रपणे घट्ट असल्याचे विरोधकांसह सर्वांसमोरच एकप्रकारे त्यांनी उघड केले... 
येथील पालिका निवडणूक थोड्याच अंतरावर राहिली आहे... या निवडणुकीच्या अनुषंगाने आजपर्यंत केवळ आपला वापरच झाला आणि आपल्या दुफळीचा फायदा उठवला गेला अशी धारणा  कराड दक्षिण आणि उत्तरच्या दोन्ही आमदारांची झाल्याचे समजते... त्यामुळे यावेळच्या शहराच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ताकही फुंकून पिताना हे दोन्ही आमदार सध्या दिसत आहेत... म्हणूनच पालिकेच्या निवडणुकीत हे दोघे एकत्र येऊन ही निवडणूक लढतील असे राजकीय भाकीत व्यक्त होत आहे... तसे झाल्यास गटबाजी करणारा संपूर्ण विरोध थोपवण्यास मदत होणार आहे असे जाणकारांचे मत आहे...महत्वाचे म्हणजे या दोन आमदारांनी एकत्र यावे अशी लोकभावनाही आहे... त्यामुळेच प्रीतिसंगम घाटावरील पोलीस चौकीच्या उदघाटन प्रसंगाच्या निमित्ताने खासदार श्रीनिवास पाटील यांनी दक्षिण उत्तरच्या दोन्ही आमदारांची महाआघाडी शहराच्या होणाऱ्या निवडणुकीत एकत्रपणे लढणार असे एकप्रकारे सुचवले ! तर दोन्ही आमदारांनी एकमेकांच्या कार्याचे कौतुक करत त्याला दुजोराही दिला...! या दोन्ही आमदारांचा एकमेकांबरोबर कार्यक्रम घेण्याचा सपाटा आणि त्यातून या दोघांचा समन्वय खूपच वाढला आहे...आणि हेच समोर बसलेल्या विरोधकासहींत पत्रकारांना देखील दाखवण्याचा काल प्रयत्न झाला...त्यासाठी प्रीतिसंगम घाट येथील पोलीस चौकीच्या उदघाटनाचे निमित्त निवडले गेले इतकंच ! अशी चर्चा आहे...

मोदी सरकार देणार राज ठाकरेंना सुरक्षा!योगी सरकार कडूनही मिळणार विशेष सुरक्षा...

वेध माझा ऑनलाइन - मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या  संघटनेने धमकी दिली होती. त्यामुळे केंद्र सरकारकडून आता राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा काल पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे. त्यांना या दौऱ्यात उत्तर प्रदेश सरकार विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर आता त्याविरोधात पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असे म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा या संघटनेने मनसेला दिला होता. गुढीपाडव्यापासून राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्याला हात घातला आहे. माझा मुद्दा हा धार्मिक नसून सामाजिक असल्याचे त्यांनी म्हटले होते.

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंना काळे झेंडे दाखवणार...राज ठाकरे म्हणजे भाजपचा अनधिकृत भोंगा...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची भुमिका घेतली आहे. त्या भूमिकेचा आम्ही निषेध व्यक्त करीत असून एक मे रोजी औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेत आम्ही काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून देण्यात आला आहे. पुण्यामधील पत्रकार परिषदेत अशोकराव जाधव,अजहर तांबोळी आणि ताज सिद्दीकी यांनी भूमिका स्पष्ट केली.

मुस्लिम समाजाला आजपर्यंत प्रत्येक वेळी आरोपीच्या पिंजऱ्यात बघितले आहे, हे अनेक घटनांमधून समोर आले आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा काढले नाही तर आम्ही तिथे हनुमान चालीसा लावून असे विधान केले. त्याही पुढे जाऊन आम्हाला तीन तारखेपर्यंत मुदत दिली आहे. हे आम्हाला मान्य नसून राज ठाकरे यांचे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहेत. राज ठाकरे यांच्या पाठीमागून भाजपा ही खेळी खेळत असून राज ठाकरे हे भाजपाचे अनाधिकृत भोंगा आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलूच नये. पण आम्ही या विरोधात सनदशीर मार्गाने उत्तर देऊ, असं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने सांगितलंय.

जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही ; खासदार सुप्रिया सुळे यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल...

वेध माझा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. गुढीपाडवा आणि ठाण्यातील सभेत त्यांनी भोंग्यावर विशेष लक्षकेंद्रित केले आहे. ठाण्यातील सभेत राज यांनी मशिदीवरचे भोंगे तीन मे पर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा देशभरात हनुमान चालीसा लावली जाईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदत मुस्लिम बांधवानी भोंग्यांबाबत आमचे ऐकावे अन्यथा हनुमान चालीसा लावली जाईल. अशी आक्रमक भूमिका कालही राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. त्या पार्शवभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. ''महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही असं त्या म्हणाल्या आहेत. पुण्यातील इंदापूरात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.''  

सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारचा डेटा सांगतो की, नवीन उद्योगांच्या उभारणीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करणे  तुम्हाला शोभत नाही असं त्या राज ठाकरेंना नाव न घेता बोलल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरे आणि मराठीवर खरंच प्रेम असेल तर त्या खाल्ल्या मिठाला जागा. महाराष्ट्राची बदनामी करू नका. तुम्हाला जे भाषण करायचे ते करा पण आम्हाला कामे द्या. भाषण करून दोघांच्या आयुष्यात अजिबात फरक पडणार नाही. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही,'' अशा शब्दात सुळेंनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांची बैठक संपली ; भोंग्या संदर्भात काय झाला निर्णय...?

वेध माझा ऑनलाइन - नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जिल्ह्यात भोंग्यांसंदर्भात दिलेल्या आदेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येत आहे. कारण आताच समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील धार्मिक स्थळांवर भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक असणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

दरम्यान आज पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी परवानगी अनिवार्य अंमलबजावणी बाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं की, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सोबत बैठक घेणार आहेत. राज्यातील कायदा व्यवस्थावर चर्चा करून एक दिशानिर्देश तयार करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसांत गाईडलाईन जारी केले जाई. सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारच्या हालचाली सुरू ; बेकायदेशीर भोंगे हटवण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक ;

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवावे असा इशारा दिला आहे. त्यासाठी सरकारने मौलवींशी चर्चा करावी असंही राज ठाकरेंनी सांगितले होते. त्यानंतर आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बेकायदेशीर भोंगे हटवण्याबाबत गृह विभागाने सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पोलीस महासंचालक बैठक घेणार आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यातही बैठक होणार आहे.


सर्वधर्मीय सलोखा ठेवणे हा पोलिसांचा हेतू आहे. कुणालाही भोंगे अथवा स्पीकर लावायचे असतील तर त्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे असा निर्णय गृह खात्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस महासंचालकांच्या बैठकीला सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची उपस्थिती राहणार आहे. कायद्याचे पालन सर्वांसाठी आहे. त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही बैठक आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर गृह विभाग सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे.


तत्पूर्वी नाशिक पोलिसांनी भोंग्यांबाबत नोटीस जारी केले आहे. नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडेय म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी आदेश जारी केले आहे. सर्व धार्मिकस्थळावरील भोंगे, स्पीकरची परवानगी घेणं बंधनकारक आहे. ३ मेनंतर बेकायदेशीर भोंगे हटवण्यात येतील. जर कुणाला हनुमान चालीसा पठण करायचं असेल तर ते मशिदीपासून १०० मीटर अंतरावर आणि दोन्ही एकाचवेळी वाजवू नये. अजानपूर्वी किंवा नंतर १५ मिनिटांनी हनुमान चालीसा लावली तरी हरकत नाही. कुणीही बेकायदेशीर भोंगे लावले तर ४ मेपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करून भोंगे जप्त करण्यात येतील. जो कोणी बेकायदेशीर भोंगे लावेल त्यांना ४ महिने ते १ वर्ष कारावास भोगावा लागू शकतो. 

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवावे अशी मागणी केली होती. त्यानंतर उत्तरसभेत यावर स्पष्टीकरण देताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केले जावे असं सांगत ३ मे पर्यंत भोंगे हटले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी त्याचा पुनरुच्चार केला. राज ठाकरे म्हणाले की, "देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ. त्यामुळे आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Sunday, April 17, 2022

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. रजनी यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मंगेश यांच्या पत्नी रजनी यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या नेमकी का केली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मतदारसंघातील नागरीकांना धक्का बसला आहे. रजनी यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची चर्चा सुरु आहे. पण त्याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही

लेखक जेम्स लेनचा खुलासा ; इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे घेतली मुलाखत...

वेध माझा ऑनलाइन - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही सध्या मोठा वाद सुरू आहे.यामुळे आता स्वत: लेखक जेम्स लेनने या विषयावर खुलासा केला आहे. इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे मुलाखत घेतली 

जेम्स लेन यांनी 16 एप्रिलला इंडिया टुडे ला दिली मुलाखत.. . 

जेम्स लेन यांनी 16 एप्रिलला इंडिया टुडे मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की..., 2003 मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या Shivaji: Hindu King in Islamic India पुस्तकासाठी पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते. 

कोणीही मला माहिती पुरवली नाही... माझं पुस्तक कथा आणि लोक ते कसं सांगतात, त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या मूल्यांबद्दल आपल्याला काय कथा सांगतात, याबद्दल होतं...

जो कोणी माझं पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल... मी शिवाजी महाराजांचा अपमान केला, अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही... पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो.., ऐतिहासिक तथ्य नाही”. 

माझी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत कधीच चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं... 

“छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते असेही ते म्हणाले.”


देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहा, जर 3 तारखेला समजलं नाही तर...राज ठाकरेंनी दिला पुन्हा इशारा...

वेध माझा ऑनलाइन - देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहावं. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल' असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिला. तसंच, 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती झाल्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भोंग्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

'आम्हाला कुठली ही दंगल नको.  देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहा. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल, भोंग्याचा मुस्लीमांना सुद्धा त्रास होतोय. देशभरातल्या लोकांना एवढंच सांगणं आहे हा भोंग्याचा विषय धार्मिक नाही सामाजिक आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
आमची सर्व तयारी सुरू आहे आम्हाला शांतता भंग करायची नाही आहे.  प्रार्थनेला विरोध नाही पण जर त्यांना लाऊड स्पीकर वर ऐकवायचं असेल तर आम्ही ही आरत्या भोंग्यावर लाऊ, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार आहे. आणि ५ जूनच्या दिवशी अयोध्येला जाणार आहे. 5 तारखेला सहकाऱ्यांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज यांनी केली

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केल्या २ महत्त्वाच्या घोषणा...पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा केला बुलंद...

वेध माझा ऑनलाइन - भोंगे हटाव ही मोहीम धार्मिक नाही तर सामाजिक आहे. देशातील न्यायव्यवस्थेपेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर ३ तारखेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर जशास तसं उत्तर देऊ. महाराष्ट्रात आणि देशात कुठल्याही प्रकारची दंगल नको. शांतता भंग करण्याची गरज नाही. प्रार्थनेला कुणाचाही विरोध नाही. भोंगे हटणार नसतील तर आमच्याही आरत्या तुम्हाला ऐकायला लागतील असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा बुलंद केला आहे.दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. 

मुस्लीम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.
हनुमान जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खालकर चौकातील मारुती मंदिरात शनिवारी मारूतीची महाआरती केली. हनुमान जयंतीचा मुहूर्त व राज ठाकरे यांनी ‘तुमचे भोंगे काढा, अन्यथा आम्ही आमची हनुमान चालिसा लावू’ म्हणून दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर या महाआरतीला अभूतपूर्व गर्दी झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली चांदीची गदा उंचावून ठाकरे यांनी या गर्दीला अभिवादन केले. राज यांनी कृतीतून बरेच काही दाखवून दिले. सहा वाजताची वेळ असताना ते साडेसात वाजता मंदिरात आले. मंदिरात जाऊन राज यांनी मारुतीची सांग्रसंगीत पूजा केली. आरती संपल्यावर लगेचच मंदिराच्या आवारात बसलेल्या सालसर मंडळाने हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. ते पूर्ण होईपर्यंत राज चौथऱ्यावर उभे होते.

भोंगे हटवा असं आदेशात म्हटलं नाही – गृहमंत्री
न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवा असे कुठेही म्हटले नाही. न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपनाला बंदी घातली आहे. त्यामुळे, ज्या मशिदींनी, मंदिरांनी परवानगी घेतली आहे आणि कायद्याचं पालन जे करत आहेत, तेथील लाऊडस्पीकर काढायचा प्रश्नच येत नाही असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास आम्ही मंदिरांवर लाऊडस्पीकर लावून, तेथे हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा दिला आहे.

Saturday, April 16, 2022

आर एस एस च्या पदाधिकाऱ्याची हत्या...

वेध माझा ऑनलाइन - केरळमधील पलक्कड जिल्ह्यात २४ तासांत दुसरी राजकीय हत्या झाली आहे. शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी एसके श्रीनिवासन यांची सहा जणांनी हत्या केली. 45 वर्षीय श्रीनिवासन यांच्या मोटारसायकल गॅरेजमध्ये सहा जणांनी पोहोचून त्यांची गळा आवळून हत्या केली. आरएसएस नेत्याच्या हत्येनंतर स्थानिक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली.

स्थानिक टीव्ही चॅनेल्सवर चालवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार मोटारसायकलवरून सहा जण श्रीनिवासन यांच्या दुकानात पोहोचले आणि त्यांच्यावर हल्ला केला. पोलीस  आरोपीच्या शोधात परिसरात छापेमारी करत आहेत. याच भागात शुक्रवारी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यांनतर आज RSS नेत्याची हत्या हि दुसरी हत्या झाली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
आदल्या दिवशी झालेल्या पीएफआयचे नेते सुबैर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी चार आरएसएस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी दुपारी मशिदीत नमाज अदा करून घरी परतत असताना सुबैर (४३) यांची जिल्ह्यातील एलाप्पल्ली येथे हत्या करण्यात आली. येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पीएफआय नेत्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आपल्या नेत्याच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप पीएफआयने शुक्रवारी केला होता. आरएसएस नेत्यावर सूडबुद्धीने हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे.