Monday, April 11, 2022

आज पुन्हा एकदा होणार राजगर्जना ; ठाण्यात राज ठाकरे यांची उत्तरसभा ; काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष...

वेध माझा ऑनलाइन -  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तरसभा आहे. ही सभा वादळी ठरण्याची चिन्हं आहेत. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे उतरवावेच लागतील असे वक्तव्य केले होते. या भाषणाचे पडसाद अद्याप देखील कायम असून आज उत्तरसभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्व्यांचे लक्ष लागलेले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे. तब्बल 200 चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांची रॅली ठाणे चेकनाक्यावरुन कार्यक्रमाच्या ठिकाणांपर्यंत काढण्यात येणार आहे. या उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, शरद पवार, एसटी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांची ठाण्यातील उत्तरसभा ही याआधी 9 एप्रिल रोजी होणार होती. तलावपाळी या ठिकाणी सभा घेण्याचा प्रस्ताव मनसेने पोलिसांना दिला होता. पण या ठिकाणी 9 तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ही सभा आज होणार आहे.


No comments:

Post a Comment