वेध माझा ऑनलाइन - कराड येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गब्बर ग्रुपला कराड रोटरी क्लबचा मानाचा व प्रतिष्ठेचा सामाजिक विभागातून दिला जाणारा यावर्षीचा कराड रोटरी अवार्ड 2021 - 2022 पुरस्कार आज सन्मानपूर्वक आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
यावेळी आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गब्बर ग्रुपने लोकहिताचे सामाजिक कार्य करून मोठा नावलौकिक मिळवला आहे या ग्रुपने कोविड काळात मोठं काम केलं आहे अनेकांना सर्वतोपरी मदत करत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांच्या कार्याने आपल्या गावाचा लौकिक वाढला आहे असे गौरवोद्गार देखील त्यांनी याप्रसंगी काढले
कराड येथील सामाजिक कार्यात येथील गब्बर ग्रुप हा नेहमीच अग्रेसर असतो कोविड काळापासून ते शहरात पूर परिस्थिती असो किंवा कोणतेही जनहीताचे सामाजिक कार्य असो या ग्रुप ने पुढे होऊन ते कार्य तडीस नेत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे
जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आवर्जून या ग्रुपचे खुलेआम कौतुकही केले आहे
कराडच्या रोटरी क्लबने या ग्रुपच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्याची दखल घेत या ग्रुपला यावर्षीचा सामाजिक विभागातून दिला जाणारा कराड रोटरी अवार्ड हा पुरस्कार जाहीर केला होता आज सन्मानपूर्वक हा पुरस्कार आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी गब्बर ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते
No comments:
Post a Comment