Saturday, April 16, 2022

आर एस एस च्या पदाधिकाऱ्याची हत्या...

वेध माझा ऑनलाइन - केरळमधील पलक्कड जिल्ह्यात २४ तासांत दुसरी राजकीय हत्या झाली आहे. शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी एसके श्रीनिवासन यांची सहा जणांनी हत्या केली. 45 वर्षीय श्रीनिवासन यांच्या मोटारसायकल गॅरेजमध्ये सहा जणांनी पोहोचून त्यांची गळा आवळून हत्या केली. आरएसएस नेत्याच्या हत्येनंतर स्थानिक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली.

स्थानिक टीव्ही चॅनेल्सवर चालवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार मोटारसायकलवरून सहा जण श्रीनिवासन यांच्या दुकानात पोहोचले आणि त्यांच्यावर हल्ला केला. पोलीस  आरोपीच्या शोधात परिसरात छापेमारी करत आहेत. याच भागात शुक्रवारी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यांनतर आज RSS नेत्याची हत्या हि दुसरी हत्या झाली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
आदल्या दिवशी झालेल्या पीएफआयचे नेते सुबैर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी चार आरएसएस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी दुपारी मशिदीत नमाज अदा करून घरी परतत असताना सुबैर (४३) यांची जिल्ह्यातील एलाप्पल्ली येथे हत्या करण्यात आली. येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पीएफआय नेत्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आपल्या नेत्याच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप पीएफआयने शुक्रवारी केला होता. आरएसएस नेत्यावर सूडबुद्धीने हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

No comments:

Post a Comment