वेध माझा ऑनलाइन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री 'जॅकलिन फर्नांडिस' हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्रीविरोधात ईडीने महत्त्वाची कारवाई केली आहे. ईडीने जॅकलिन फर्नांडिसची संपत्ती जप्त केली आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे.
ईडी ने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, कॉनमन सुकेश चंद्रशेखर ज्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे ती फिक्स्ड डिपॉझिट असल्याची माहिती ANI ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
सुकेश चंद्रशेखरला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झालेली असून त्याचे नाव बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसह जोडले गेले. यामध्ये जॅकलिनचे नाव आघाडीवर होते. तो या सेलिब्रिटींना महागड्या वस्तू पाठवत असल्याचे समोर आले होते 200 कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंग प्रकरणाशिवाय याआधीही त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले होते.
No comments:
Post a Comment