Tuesday, April 12, 2022

राज ठाकरेंकडून राष्ट्रवादी टार्गेट...आव्हाड नाग... तर जयंत पाटील म्हणजे जंत... राज ठाकरेंचा हल्लाबोल...

वेध माझा ऑनलाइन - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांची तोफ ठाण्यात धडाडली. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला टार्गेट करत शरद पवार  अजित पवार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरच जोरदार टीकाकस्त्र सोडले. जयंत पाटील यांना जंत पाटील तर आव्हाडांना थेट नागांची उपमाच देऊन राज ठाकरे जोरदार बरसले.

गुढीपाडव्याच्या सभेनंतर महाविकास आघाडीच्या सर्वच मंत्री आमदारांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला उत्तर म्हणून आज ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी आपल्या शैलीत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. 
शरद पवार यांनाही नोटीस येणार याची चाहूल लागली होती. त्यानंतर किती नाटक केलं. एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची कारवाई झाली. मग सुप्रिया सुळे यांच्या घरी का होत नाही. शरद पवार लगेच पंतप्रधान मोदींची भेट घेतात. अनिल देशमुख यांचा मार्ग मोकळा केला. नवाब मलिक जास्त बोलताय, मग हे मोदींना भेटले. त्यानंतर पुन्हा मोदींना भेटले आणि मलिक मध्ये गेले. आता संजय राऊत यांच्याबद्दल पवार मोदींना भेटले. संजय राऊतांना कुठे लटकवतील ना,कळणार सुद्धा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.


अजित पवारांना व्हिडीओ लावून सुनावले
'अजित पवार यांना पठ्ठा म्हणायची सवय आहे. तुमच्या माहितीसाठी मी 3 व्हिडीओ आणले आहे.  मी केव्हा काय बोललो हे मला नीट आठवतं. मी याच्याआधीही बोललो होतो. पण, त्याचे मला काही सापडले नाही. काय झालं, सकाळचा शपथविधी झाला, तो पवार साहेबांना कान काही ऐकू येत नाही. तसा त्यांना बॉम्ब फुटल्यानंतर कू असा आवाज येत होता. 28 जुलै 2018 रोजी मी बोललो होतो, असं म्हणत भोंग्याबद्दल व्हिडीओ चालून दाखवला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2018 रोजी बोललो होतो, त्यावेळीही मी औरंगाबादमध्ये भोंग्याची स्पर्धा सुरू आहे, त्यांना अजान वाचायची असेल तर वाचा, लाऊडस्पिकर कशाला पाहिजे, असा व्हिडीओच लावून दाखवला. लॉकडाऊन लागण्याआधी सुद्धा अधिवेशनामध्ये सुद्धा मशिदीमध्ये भोंगे सुद्धा बंद केले पाहिजे, असं बोलणार व्हिडीओ राज ठाकरेंनी भर सभेत वाजवून दाखवले.

सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे 'सुळे' वेगळे
"अजित पवारांकडे रेड पडते. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी रेड पडते. त्यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत मधूर संबंध असतात. हे कसं काय? पवारांना बोलताना भडकलेलं मी कधी बघितलं नाही. मी जेव्हा बोलत होतो तेव्हा सगळ्यांच्या शेपट्या आतमध्ये होत्या. सुप्रिया सुळे यांनी काही बोलायचे नाही. यांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे 'सुळे' वेगळे आहे", असा घणाघात राज ठाकरे यांनी यावेळी केला..


जितेंद्र आव्हाड म्हणजे नाग! तर जयंत पाटील जंत...
'काय पण घ्याल, नागाने फना काढावा ना असा, उद्या परत काही तरी बोलेल, डसतो वगैरे, ये शेपटी पकडून फेकून देतो. वस्तरा सापडला तर राजकारण सोडून देईल म्हणाले. आता तिथे वस्तारा कसा सापडणार, दाढी कुणी करतच नाही. मग वस्तारा कसा सापडणार. आव्हाडांच्या बुद्धीची कीव येते, असा सणसणीत टोला राज ठाकरेंनी लगावला.तसेच जयंत पाटील म्हणजे जंत असल्याचा टोला त्यांनी लगावला

'24 ऑगस्ट 2001 रोजी मुंब्रा परिसरात सिमीच्या 6 दहशतवाद्यांना अटक केली. मुंब्य्रातून संसदेवरील अबू हजमाला हल्ल्यातील आरोपीला अटक केली. चार दहशतवाद्यांना मुंब्य्रातून अटक केली आहे.  गुजरातमध्ये चकमकीत ठार झालेली इशरज जहाँ शेख ती इथंच राहत होती. मुज्जमील शेख हा दहशतवादी इथंच राहत होता. मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंब्र्यातूनच अटक केली. जिथून आव्हाड निवडून येतो त्या मुंब्र्यात अनेक वेळा अतिरेकी सापडले. देशावर प्रामाणिक प्रेम करणारा मुसलमान यात भरडला जातो. धर्माचा अतिरेक करणाऱ्या मुसलमानांमुळे प्रामाणिक मुसलमान भरडले जातात' अशी यादीच वाचून दाखवत आव्हाडांची पोलखोल केली.


No comments:

Post a Comment