Thursday, April 14, 2022

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची दिसून आली अशीही कार्यतत्परता...निमित्त होते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचे...नेता असावा तर असा...लोकांनी दिल्या प्रतिक्रिया...

वेध माझा ऑनलाइन - आज नामदार बाळासाहेब पाटील यांच्यातील तत्पर नेता लोकांसमोर दिसला...आज डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील बुधवार पेठेतील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री आले असता शहराला त्यांच्या कार्यतत्परतेचा "स्पार्क' सहज अनुभवता आला...आणि त्याचीच चर्चा त्याच ठिकाणी बराच वेळ होती

त्याचे झाले असे की,...

आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त येथील बुधवार पेठेतील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता शहरातील पुढारी म्हणवणारे अनेकजण आज याठिकाण आवर्जून दिसले...त्याठिकाणी अभिवादन करण्याकरिता लोकांचे येणे-जाणे तिथे चालू असतानाच पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांचीदेखील त्या ठिकाणी एन्ट्री झाली...आता राज्याचे मंत्री महोदय आले म्हणजे प्रशासनाची धावपळ दिसतेच...ती दिसली...मात्र लोकांचा घोळका तत्काळ त्या ठिकाणी जमला... लोकनेत्याचे हेच लक्षण असते...राजकारणात अनेकांना अनेकजण सोडून लांब गेलेले पहायला मिळतात...मग असल्या राजकारण्यांना गर्दी करावी लागते... अजूनही आमच्यामागे लोक आहेत हे दाखवण्यासाठी...पण लोक खूप हुशार असतात...त्यांना सगळं समजत...मात्र आज नामदार साहेब आल्यानंतर त्याठिकाणी लोकनेत्याचे आगमन झाल्याचे जाणवले...अशा नेत्यांना गर्दी दाखवावी लागत नाही किंवा करावी लागत नाही...तर लोक आपसूकच घोळका करून तिथे आपुलकीने तिथे येतात...गर्दी करतात...तसे तेथेही लोक जमले...त्यानंतर बाळासाहेबानी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. एका कामानिमित्त लगेच त्यांना जायचेही होते म्हणून गडबडीने ते जाण्यासाठी गाडीत बसले...तेवढ्यात त्यांच्यावर प्रेम करणारे विजय कांबळे व अमोल सोनवले यांच्या कुटुंबाने त्यांना चहा पिण्यासाठी बोलावले...चहा तयार आहे का...?असे विचारतच आपल्या निष्ठावन्त कुटुंबाच्या आग्रहाखातर व प्रेमाखातर साहेब गाडीतून पुन्हा उतरले...व त्याच चौकातील सोनवले व कांबळे  यांच्या बिल्डिंग मध्ये चहा पिण्यासाठी त्यांच्या घरी तिसऱ्या मजल्यावर जाऊ लागले...त्या बिल्डिंग ची उंची व त्याच्यासमोर असलेल्या पालिकेच्या शाळा नंबर 10 च्या बिल्डिंग ची उंची सारखीच आहे...साहेबांनी सहज दुसऱ्या जिन्यावरून वर जाताना त्या शाळेकडे पाहिले तेव्हा त्या शाळेची बाहेरून झालेली दुर्दशा त्यांना दिसून आली...त्यांनी त्याच ठिकाणी सी ओ ना जरा बोलावून घ्या...असे सांगितले... चहा- पान झाल्यावर त्यांनी सी ओ ना त्या 10 नंबर शाळेचे वरून उघडे पडलेले बाथरून,तुटलेला स्लॅब, बिल्डिंग चा गेलेला रंग, खराब झालेले छप्पर व पत्रे...त्या बिल्डिंग वरूनच समोरुन दाखवून दिले व या दुर्दशेच कारण जाणुन घेत त्या शाळेच्या या पडझडीला त्वरित दुरुस्त करून घेऊन मला रिपोर्ट करा असे सांगितले...याच शाळेच्या समोर पालिकेने काढलेल्या खड्यात पडून एका चिमुकल्याचा काही दिवसांपूर्वीच अंत झाला होता...ही गोष्ट अद्याप ताजी असतानाच अजूनही त्या शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे साहेबांच्या त्याचवेळी लक्ष्यात आले...आणि म्हणूनच त्यांनी आपली कार्यतत्परतेला दाखवत आपले कर्तव्यही प्रशासनाला सूचना देत यावेळी चोख बजावले... याला म्हणायचं लोकांचा लोकांसाठी लोकांनी निवडून दिलेला नेता... सलग पाच वेळा आमदार म्हणुन निवडून येण्याची धमक, लोकांचा मिळवलेला विश्वास, आणि जोडलेला माणूस परत कधीही लांब गेला नाही अशी माणुसकी...अशा भरभरून गुणांनी सज्ज या नेत्याचा हा कार्यतत्परपणा इथे आज सहज पहायला मिळाला... म्हणूनच केला हा लेखनप्रपंच...

1 comment:

  1. होय खरोखरच लोकनेता आहेत

    ReplyDelete