वेध माझा ऑनलाइन - नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जिल्ह्यात भोंग्यांसंदर्भात दिलेल्या आदेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येत आहे. कारण आताच समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील धार्मिक स्थळांवर भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक असणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
दरम्यान आज पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी परवानगी अनिवार्य अंमलबजावणी बाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं की, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सोबत बैठक घेणार आहेत. राज्यातील कायदा व्यवस्थावर चर्चा करून एक दिशानिर्देश तयार करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसांत गाईडलाईन जारी केले जाई. सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment