Tuesday, April 12, 2022

सदावर्तेच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला भाजपाकडून पन्नास हजार रुपयाच बक्षीस जाहीर ...

वेध माझा ऑनलाइन - वकील गुणरत्न सदावर्तेच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला बीड भाजपा तालुका अध्यक्षांनी केल पन्नास हजार रुपयाच बक्षीस जाहीर केलं आहे. गुणरत्न सदावर्ते हे समाज विघातक माणूस आहेत. समाजामध्ये आणि जातीय तेढ निर्माण करणारे आहेत. तसेच त्याच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते, म्हणून गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल करावा.अशी मागणी बीड भाजपचे  तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी बीडचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिली आहे, या तक्रारीवर कारवाई नाही केली. तर 'जो कोणी गुणरत्न सदावर्ते यांच्या तोंडाला काळं फासेल त्याला 50 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. असे देखील तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या घरावरती झालेल्या हल्ल्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना भडकविल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. सदावर्ते यांच्यावर यापुर्वी देखील प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी सातारा पोसिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. तसंच सातारा पोलिस देखील त्यांचा ताबा मागण्यासाठी काल कोर्टात हजर झाले होते.

No comments:

Post a Comment