वेध माझा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदींवर भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मनसेच्या या भूमिकेवर काही मुस्लिम संघटना नाराज आहेत. विशेष म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने तर 'छडोगे ते छोडेंगे नहीं' अशी धमकीच दिली आहे. याशिवाय राज ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याची माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. राज ठाकरे यांना त्यांच्या मिशिदींवरील भोंगे काढण्याच्या भूमिकेवरुन अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तसेत राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. याशिवाय येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत बैठकीत नेमकं काय-काय घडलं याबाबतची माहिती दिली.
राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्या सभेची सर्व तयारी झाली आहे. तसेच राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी देखील सर्व तयारी करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्ते अक्षय तृतीयाला पोलिसांची परवानगी घेऊन हनुमान चालीसा पठण करणार आहेत. राज ठाकरेंनी अक्षय तृतीयाला महापूजा करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन धमकीच फोन येत आहेत. त्या मुद्द्यावर नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न काही पत्रकारांनी विचारला तेव्हा बाळा नांदगावकर यांनी या प्रकरणी आपण राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. पण त्यावर आतापर्यंत काहीच उत्तर आलेलं नाही. आता आपण पुन्हा राज्य आणि केंद्रीय गृहमंत्री दोघांना राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्याबाबत पत्र लिहिलं आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात पत्र पाठवलं होतं. त्याबाबतची माहिती आज राज ठाकरेंना देण्यात आली, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत राज ठाकरे यांचा सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबादमधील मैदानाची आपण रेकी केली असून त्यानुसार नियोजन केलं जात असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वे बुक करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी पत्र पाठवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment