वेध माझा ऑनलाइन - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुंबै बँक प्रकरणी दरेकर यांचा हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मुंबै बँकेत बोगस मजूर प्रकरणी दरेकर यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी आज कोर्टाने सुनावणी झाली आहे. हायकोर्टाने दरेकर यांना ५० हजाराच्या मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
प्रवीण दरेकर गेल्या 20 वर्षापासून मजूर या प्रवर्गातून मुंबै बँकेवर निवडून येत होते. पण दरेकर हे मजूर नाहीत, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत.
मजूर सदस्य प्रकरण काय आहे?
प्रवीण दरेकर गेल्या 20 वर्षापासून मजूर या प्रवर्गातून मुंबै बँकेवर निवडून येत होते. पण दरेकर हे मजूर नाहीत, अशी तक्रार आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. ही तक्रार विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती. यावेळी दरेकर यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे 3 जानेवारी 2022 रोजी विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविले होते. यानंतर त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
No comments:
Post a Comment