Wednesday, April 20, 2022

दिल्लीत कोरोनाचा पुन्हा विस्फोट ; एका दिवसात किती रुग्ण वाढले पहा...

वेध माझा ऑनलाइन - देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकट ओसरल्याचं चित्र होतं. पण आता कोरोनाने पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येचा आज विस्फोट होताना दिसत आहे. कारण दिल्लीत गेल्या 24 तासात तब्बल 1009 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. चीनमध्ये सध्या स्थितीत कोरोना संकटाची भीषण परिस्थिती असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. तिथे लॉकडाऊननंतरही कोरोना नियंत्रणात येत नसल्याच्याही चर्चा सध्या सुरु आहे. पण देशात सध्याच्या घडीला तशी परिस्थिती नाही. तरीही एकाच दिवसात दिल्लीत तब्बल 1009 रुग्णांची वाढ होणं ही चिंतेची बाब आहे.

कोरोनाचा ओमायक्रोन हा विषाणू जास्त संसर्गजन्य आहे. त्याचा संसर्ग होण्याचा वेग प्रचंड जास्त आहे. त्यामुळे याच विषाणूची ही साथ असल्याचा अंदाज आहे. कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता घाबरुन जाण्याची गरज नाही. पण काळजी घेण्याची प्रचंड आवश्यकता आहे. याआधी कोरोनाच्या तीन लाटांना आपण थोपवलं आहे. त्यामुळे ही लाटही निघून जाईल. कोरोना संकट नाहीसं होईल, अशी आशा बाळगूया. दरम्यान, दिल्लीत वाढती कोरोनाची रुग्णसंख्या पाहत मास्क सक्ती करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मास्कसक्ती करण्यात आली असून जो मास्कचा वापर करणार नाही त्याल 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. आता हे संकट किती दिवसांनी निवळेल हे आता येणाऱ्या काळात दिसेल. पण काळजी घेतलं तर हे संकट लवकर निवळण्याची शक्यता आहे.
दिल्लीत सध्या कोरोनाचा सकारात्मकता दर हा 5.70 टक्के इतका आहे. दिवसभरात 1009 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 54 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. तर इतर रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तसेच दिल्लीत आज दिवसभरात 314 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची नोंद झाली आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता आजूबाजूच्या राज्यांमध्येही त्याचे पडसाद पडू लागले आहेत. दिल्लीत रुग्णवाढ झाल्यानंतर हरियाणा सरकारने दिल्ली सीमालगतच्या चार राज्यांमध्ये मास्कची सक्ती केली आहे. गुरुग्राम, फरीदाबाद, सोनीपत, झज्जर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

No comments:

Post a Comment