Friday, April 15, 2022

भाजपचे पेंढारकर, काँग्रेसचे झाकीर पठाण यांची दोस्ती राजकारणापलीकडे जाऊन जपलेली...


वेध माझा ऑनलाइन - राजकारणात कोणी कोणाचे नसते असे म्हटले जाते ना मित्र, ना शत्रू कोणतेही नाते यामध्ये नसते मात्र राजकारणात राजकारणा पलीकडे जाऊन मैत्री केलेली नक्की पहायला मिळते...ती देखील काही मोजक्या वैचारिक लोकांमध्ये ती दिसून येते... या लोकांना राजकारणासाहित लोकांच्या मनात मानाचे स्थान नक्कीच असते !
काँग्रेसच्या झाकीर पठाण व भाजप च्या घनश्याम पेंढारकर यांच्या दोस्तीची "मिसाल' अशीच सांगितली जाते...

कराडचे राजकारण विविध राजकीय पक्ष, अनेक गटतट तर काही व्यक्तींना समोर ठेवून चाललेलं पहायला मिळते त्यामध्ये निष्ठावनत व संधीसाधू असे दोन प्रकार पहायला मिळतात काँग्रेस चे निष्ठावंत अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख झाकीर पठाण व भाजपशी एकनिष्ठ असणारे श्री पेंढारकर हे दोघे कराडच्या चालणाऱ्या राजकारणात आपापल्या पक्षाशी संपूर्णपणे बांधील राहून काम करताना पाहायला मिळतात...पण या दोघांच्या मैत्रिची चर्चा करायची म्हटले तर हे दोघेही एकमेकांच्या भावापेक्षा काही कमी नाहीत...या दोघांनाही आपापल्या राजकीय मर्यादा माहीत आहेत त्या न ओलांडता आपली बंधुतुल्य मैत्री हे दोघेही जपताना नेहमी दिसतात जेव्हा एकत्रपणे हे दोघे असतात तेव्हा त्या दोघांमध्ये राजकारणाचा कसलाही लवलेश नसणारी चर्चा होत असते त्यामध्ये एकमेकांच्या कुटुंबियांच्या खुशालीची चर्चा असते मुले त्यांचे शिक्षण या चर्चेसह एकमेकांच्या कौटुंबिक सुख दुःखांमध्ये सहभागी होताना हे दोघेही दिसतात 
जातीयवादी राजकारण करताना अनेकजण दिसतात अशा राजकारणाला चपराक देणारे या दोघांची मैत्री आदर्श मानली जातेय हे दोघे राजकारणापलीकडे जाऊन एजमेकांच्या अडचणीत एकमेकांसाठी धावून जाताना कधीही राजकीय अडचणींचा विचार करताना दिसत नाहीत तर त्यावेळी दिसते फक्त या दोघांमधील मैत्रीपूर्ण माणुसकी! आणि ही खूप मोठी गोष्ट आहे 
नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पार पडली यावेळी भाजप च्या नेते मंडळींबरोबर पेंढारकर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता आले होते त्याच वेळी काँग्रेसचे  जिल्ह्याचे अल्पसंख्यांक नेते झाकीर पठाण आपल्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी अभिवादन करण्याकरिता आले असता तेथे पेंढारकर व पठाण यांनी एकमेकाला पाहताच ते दोघही आपापल्या राजकीय मंडळींना तिथंच सोडून एकमेकांशी गप्पा मारत बराच वेळ बसले...
आपापल्या पक्ष विचार धारेशी हे दोघेही एकदम पक्के आहेत त्यांच्या एकनिष्ठतेची उदाहरणे इतरांना दिली जातात...विरोधक देखील त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल आदर दाखवतात...मात्र राजकारणात विरोधक असूनही राजकारणा पलीकडे हेच दोघे एकमेकांचे भाऊ आहेत की मित्र असे वाटावे इतपत आपली मैत्री जपतात  याचीच चर्चा नेहमीच होत असते...डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त हे दोघे असेच एकत्र दिसले आणि पुन्हा या दोघांच्या राजकारणापलीकडील मैत्रीची चर्चा झालीच...

No comments:

Post a Comment