Wednesday, April 13, 2022

मुख्याधिकारी डाके यांच्या आश्वासनानंतर आज कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण घेतले मागे...लोकशाही आघाडीची महत्वपूर्ण मध्यस्थी झाल्याची कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया...


वेध माझा ऑनलाइन - 
आज येथील पालिका कर्मचाऱ्यांचा गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेला अनुकम्पा तत्त्वावरील कर्मचारी भरतीबाबतच्या प्रश्नाला पूर्ण विराम मिळाला! पालिकेतील अनुकम्पा यादीत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची नियुक्तीपत्रे अद्यापही आली नाहीत म्हणून येत्या 11 एप्रिल पर्यंत त्या ऑर्डर्स आल्या नाहीत तर आमरण उपोषण करू त्यानंतरही 3 दिवसांनी या ऑर्डर्स आल्या नाहीत तर  सामूहिक आत्मदहन करू असा इशारा येथील काही कर्मचाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला होता आज उपोषणाचा तिसरा दिवस होता त्यामुळे उद्यापासून हा प्रश्न अधिकच चिघळण्याची चिन्हे होती
दरम्यान , लोकशाही आघाडीच्या महत्वपूर्ण मध्यस्थीने आज आम्ही उपोषण मागे घेत असल्याचे कर्मचाऱ्यांनी याठिकाणी सांगितले
येत्या काही दिवसात या कर्मचाऱ्यांना आवश्यक बाबी पूर्ण झाल्यावर ऑर्डर्स देऊ असे आश्वासन मुख्याधिकारी डाके यांनी यावेळी दिल्यावर उपोषणास बसलेल्या कर्मचाऱ्यांनी उपोषण सोडले 
यावेळी मुख्याधिकारी डाके म्हणाले,आस्थापना खर्च 55 टक्के पेक्षा कमी असेल तर या सर्व अनुकम्पा कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे सोपे जाणार आहे पालिकेचा हा खर्च त्यापेक्षा अधिक होत होता त्यामुळे या नियुक्त्या अद्याप झाल्या नव्हत्या मात्र सुदैवाने आता पालिकेचे उत्पन्न खर्चापेक्षा अधिक असल्याने या नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

दरम्यान,या सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्यापासून लोकशाही आघाडी चे मार्गदर्शन मिळाल्याचे यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले स्वतः नामदार बाळासाहेब पाटील सुभाष काका पाटील सौरभ पाटील यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून जिल्हाधिकारी कार्यालयातून फॉलोअप घेतला होता व त्यानुसार या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले होते
काका आजारी पडले नसते तर हा प्रश्न तेव्हाच सुटला असता आम्हाला उपोषण करण्याची वेळच आली नसती अशी प्रतिक्रिया यावेळी या कर्मचाऱ्यांनी दिली
लोकशाही आघाडीच्या मध्यस्तीने वमुख्याधिकारी डाके यांच्या सहकार्यानेच हा विषय सोडवण्यास मोठी मदत झाल्याचेही हे कर्मचारी म्हणाले
उपोषण सुटताच या सर्व कर्मचार्यांनी लोकशाही आघाडीचा विजय असो अशा घोषणा दिल्या व आदरणीय स्व पी डी पाटीलसाहेब यांच्या प्रतिमेचे मंगळवार पेठेतील निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले

No comments:

Post a Comment