वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या ठाण्यातील भायंदर येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या 40 वर्षीय पत्नीची हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.एका पतीला त्याच्या पत्नीने वाढलेल्या नाश्त्यामध्ये मीठ कमी असल्याने त्याने आपल्या पत्नीची हत्या केली.
शुक्रवारी सकाळी भायंदर पूर्वच्या फाटक रोड परिसरात ही घटना घडली. दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. निलेश घाघ असे आरोपी पतीचे नाव आहे. तो 46 वर्षांचा आहे. नाश्ता केल्यानंतर सकाळी 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास त्याने आपली पत्नी निर्मला यांची गळा आवळून हत्या केली. आरोपी पत्नीने वाढलेल्या खिचडीमध्ये मीठ कमी असल्याने नाराज होता. याचमुळे त्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. आरोपीविरोधात भायंदर येथील नवघर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment