वेध माझा ऑनलाइन - भाजपचे नेते गणेश नाईक यांना ठाणे सेशन कोर्टाने मोठा दणका दिला आहे. कोर्टाने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता गणेश नाईकांना कधीही अटक होण्याची दाट शक्यता आहे. एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे सेशन कोर्टाने याआधी 21 एप्रिलला देखील अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यावेळी 27 एप्रिलला सुनावणी होईल, असं जाहीर केलं होतं. अखेर सेशन कोर्टाने आज गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
बेलापूर पोलीस ठाण्यात शस्त्र दाखवून धमकावणे आणि नेरुळ पोलिसात बलात्कार विरोधात पीडितेने तक्रार केली होती. या दोन्ही प्रकरणात गणेश नाईकांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. गणेश नाईक सारखी प्रतिष्ठित व्यक्ती या केस संदर्भात फिर्यादीवर दबाव टाकू शकते, या कारणाने ठाणे कोर्टाने दोन्ही गुन्ह्याप्रकरणी जामीन फेटाळला आहे. विशेष म्हणजे दोन्ही पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांच्या कस्टडीची मागणी केली होती. पोलिसांना बलात्कार प्रकरणात मेडिकल करायची होती. शस्त्र दाखवण्याच्या प्रकरणात हत्यार जप्त करण्यासाठी गणेश नाईक यांच्या कास्टडीची मागणी करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment