वेध माझा ऑनलाइन - कराडातील होणारा शिवजयंती उत्सव व दरबार मिरवणूक खास पहाण्यासाठी म्हणून जिल्ह्यांतील शिवभक्त जास्तीत जास्त संख्येने इथे येतील असा आदर्शवत शिवजयंती उत्सव यावेळी होणार असल्याचे सूतोवाच हिंदू एकता आंदोलनाचे नेते नगरसेवक अण्णा पावसकर यांनी आज येथे केले शहरातील असणाऱ्या मंडळांना पोलिसांनी स्पीकर परवाना द्यावा कोणत्याही अनावश्यक निरबंधनाशिवाय या सोहळ्याला प्रशासनाने सहकार्य करावे अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली
कराड शहर पोलीस ठाण्याच्यावतीने शिवजयंती व रमाजन ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजित बोराडे, पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नगरसेवक फारूक पटवेकर म्हणाले
अण्णा पावसकर यांनी माझ्या रूपाने एका मुस्लिम कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून शहराची सेवा करण्याची संधी दिली याची जाणीव आहेच
शहरात प्रत्येकवर्षी शिवजयंती सोहळा हिंदु- मुस्लिम एकत्र येऊन साजरा करत असतो याही वेळी मुस्लिम बांधव हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून हा उत्सव साजरा करणार आहोत यावेळी निघणाऱ्या दरबार मिरवणुकीतील सर्व बांधवांना मुस्लिम बांधवांकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देण्यात येणार आहेत मिरवणूक मार्गात विविध ठिकाणी या बाटल्या देण्याची व्यवस्था मुस्लिम समाजाच्या वतीने केली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले छत्रपती शिवराय हे एका जातीधर्माचे राजे नव्हते तर ते संपूर्ण रयतेचे राजे होते त्यांनी मुस्लिम समाजाला अनेक ठिकाणी मस्जिद बांधून दिल्या आहेत आजही अनेक ठिकाणी त्यांचे अस्तित्व आहे असे सांगून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही दिल्या
कराडच्या भूमिने नेहमीच आदर्शांची जपणूक केली आहे. त्यामुळे येणारे सगळेच सण हिंदु-मुस्लिम एकत्रित साजरे करत कराडचे ऐक्य अबाधित राखतील असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला
यावेळी, अजयकुमार बन्सल म्हणाले, यापूर्वीच्या घडलेल्या काही घटनांमुळे कराडबाबत संवेदनशीलतेचा ठपका लागला आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कराड ज्या पध्दतीने सर्व धर्मसमभावाने काम करत आहे. हे पाहिल्यानंतर कराडबाबत असणारे गैरसमज दूर होत आहेत. या ऐकोपा भविष्यातही असाच कायम रहावा. येणारे सण, उत्सव सर्व जाती धर्मांनी एकत्रितपणे साजरे करावेत. हे करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकारने खालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, विजय वाटेगावकर, मजहर कागदी, दादा शिंगण, नितीन काशिद, अॅड. विकास पवार, आनंदराव लादे, प्रशांत यादव, आप्पासाहेब गायकवाड, जयंत बेडेकर यांनी शिवजयंती व रमाजन ईद हे दोन्ही सण उत्साहाने व एकोप्याने साजरे होतील याबाबत प्रशासनने निश्चिंत रहावे, अशी ग्वाही दिली.
बैठकीस शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर, शिवसेनेचे काकासोा जाधव, राजेंद्र माने शहरप्रमुख शशिराज करपे, जावेद नायकवडी, अल्ताफ शिकलगार यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.
बी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले तर पोलीस उपधिक्षक डॉ. रणजित पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment