Friday, April 22, 2022

सुप्रियाताईनी पत्रकारांशी संवाद साधला, मात्र विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे न देताच त्या निघून गेल्या...


वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीच्या  खासदार सुप्रियाताई सुळे आज कराडमध्ये आल्या होत्या येथील स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्या येथील माध्यमांशी बोलण्यासाठी आल्या त्यांनी राज्याच्या  महत्वाच्या विषयावरील प्रश्नांची समर्पक उत्तरे देणे पत्रकारांना अपेक्षित असताना केवळ गोलमोल उत्तरे देऊन त्या निघून गेल्या...

आज सुप्रिया सुळे कराडच्या प्रीतिसंगम घाट येथे स्व चव्हाण साहेबांच्या समधीस्थळावर आल्या होत्या... तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांच्याकडून माध्यमांना राज्यात चाललेल्या एकूणच चालू घडामोडीविषयी रास्त उत्तरे अपेक्षित होती मात्र पत्रकारांचा याबाबतीत हीरमोड झाला... त्यांनी गोलगोल आणि संदर्भहीन चर्चा करत ही पत्रकार परिषद गुंडालण्याचा प्रयत्न केल्याचे पत्रकारांना यावेळी जाणवले...

पत्रकारांनी खासदार सुळे याना आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची टिंगल केली...हिंदू समाजातील कन्यादान या धार्मिक विधीची थट्टा केली याबाबत मत विचारले असता... त्यांनी विषय बदलून महागाईवर लेक्चर द्यायला सुरुवात केली...महागाई एवढी झाली आहे असल्या चर्चा व असल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही... महागाईचा प्रश्न मोठा आहे असे त्या प्रश्नाशी काही संबंध नसणारे निरर्थक उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचे पत्रकारांच्या लक्षात आले... 

लेखक जेम्स लेन यांनी नुकतीच एका माध्यम 
समूहाला मुलाखत दिली... त्यात त्यांनी इतिहास तज्ञ दिवंगत लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी  आपण लिहिलेल्या पुस्तकाविषयी कसलीच चर्चा केली नव्हती अशी स्पष्टोक्ती दिली...याविषयावरून खासदार सुळे याना पुरंदरेंना आपल्या पक्षाकडून सॉफ्ट टार्गेट केले गेले या राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य आहे असे म्हणायचे का ? असे विचारताच त्यांनी पवार साहेब हे अनेकदा देवळात देवाला गेल्याचा एक दाखला देत पुन्हा वाढलेल्या महागाईची चर्चा केली...आणि  विचारलेल्या प्रश्नाला व्यवस्थित बगल दिली... याही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेच नाही...मात्र, वकील सदावरते व राज ठाकरे यांच्या एकूणच राष्ट्रवादीवर व पवार साहेबांवर होणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना त्यांनी या दोघांचे संस्कार काढले... 

जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी अंतर्गत राजकारण झाल्याची टीका त्यांनी स्वतः केली होती... त्यावर पक्ष काय ऍक्शन घेणार...या  प्रश्नाविषयी त्यांनी शशिकांत शिंदेंसमोरच प्रॉपर उत्तर देणे अपेक्षित असताना  गुळगुळीत उत्तर देत शिंदे यांनी पुन्हा जोमाने पक्षाचे काम करायचे आहे असे सांगितले...मात्र शिंदेंवर झालेल्या पक्षांतर्गत राजकारणाविषयी उत्तर देणे टाळले...हे स्वतः शशिकांत शिंदे यांच्याही लक्षात त्यावेळी आले... 

पती सदानंद सुळे याना ईडीची नाही तर इन्कमटेक्स ची नोटीस आली आहे मात्र काळजी नको... मै लढ लुंगी...असे म्हणत त्यांनी  पत्रकारांशी चाललेला हा संवाद थांबवला...
एकूणच पत्रकारांनी विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाचे त्यांनी समर्पक उत्तर न देता काहीही विचारले तरी तो विषय महागाईवर नेऊन ठेवत  वेळ मारून नेली आणि ही पत्रकार परिषद त्यांनी गुंडाळली, नंतर पुढील प्रवासास त्या निघून गेल्या...



No comments:

Post a Comment