वेध माझा ऑनलाइन - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्यासोबत जेलमध्ये दुर्व्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांची दखल स्वत: लोकसभा अध्यक्षांनी देखील घेतली आहे. त्यामुळे लोकसभा सचिवालयातून राज्य सरकारला पत्र पाठविण्यात आलं आहे. नवनीत राणा यांना जेलमध्ये खरंच त्रास दिला जातोय का? आणि त्रास दिला गेला किंवा त्यांची गैरसोय झाली का? याबाबतचा अहवाल आता राज्य सरकारला लोकसभा सचिवालयाला पाठवावा लागणार आहे. पण नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांना आता थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर उत्तर दिलं आहे. या व्हिडीओत नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दोघं पोलीस कस्टडीत चहा पिताना दिसत आहेत. व्हिडीओ बघितल्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांच्या ताब्यातअसतानाही चांगली वागणूक दिली गेल्याचं दिसत आहे.
संजय पांडे यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे?
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस ठाण्यातला सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राणा दाम्पत्य चहा पिताना दिसत आहेत. त्यामुळे आणखी काही सांगायची गरज आहे का? असा प्रश्न संजय पांडे यांनी व्हिडीओ शेअर करत उपस्थित केला आहे
No comments:
Post a Comment