वेध माझा ऑनलाइन - कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यानंतर शरद पवार, शाहू महाराज आणि खासदार श्रीनिवास पाटील गोल्फ कार्टमधून हे प्रदर्शन पाहत होते. या गाडीच सारथ्य गृहराज्यमंत्री सतेज पाटील करत होते.अर्ध्याहून अधिक प्रदर्शन पाहून झाल्यावर इलेक्ट्रीक गाडीत काही तरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे गाडी काही सुरू होईना त्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील गाडीतून खाली उतरले आणि चक्क गाडीला धक्का देण्यासाठी त्यांनी हात लावला.
वयाची ८० वर्षे पार केलेले श्रीनिवास पाटील यांनी वयाची तमा न बाळगता यावेळी गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यानं कार्यतत्परता दाखवली. गाडीत बसलेले शरद पवार यांना पुढील नियोजित सभेला पोहोचण्यास यामुळे वेळ लागू शकतो हे बरोबर ओळखून खासदारांनी गाडीला धक्का दिला. जमलेल्या नागरिकांनी ही खासदारांची कृती पाहीली आणि क्षणभर काय होत आहे हे कुणाला काही समजलंच नाही. नंतर मात्र शरद पवार यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहीलं आणि ते सभास्थळी रवाना झाले.
No comments:
Post a Comment