Thursday, April 14, 2022

तुम्ही जगा अन् इतरांनाही जगू द्या हे जैन समाजाचे मुख्य तत्व : कांतीलाल जैन...कराडात महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन

वेध माझा ऑनलाइन - तुम्ही जगा अन् इतरांनाही जगू द्या हा जैन समाजाचा मुख्य मुलमंत्र असून या तत्वानुसार भारतीय जैन समाज संघटनेच्या कराड शाखेचे कार्य चालू असून आज महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जैन संघटनेच्या कराड शाखेचे अध्यक्ष कांतीलाल जैन यांनी दिली. यावेळी बहुसंख्येने समाज उपस्थित होता.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट होते त्यामुळे गेली दोन वर्षे कोणतेही कार्यक्रम होऊ शकले नाहीत.यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्याने ही जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचे ठरवले त्यानुसार सकाळी शहरातील मुख्य भागातून मिरवणूक काढण्यात आली.काही ठिकाणी मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले.रक्तदान शिबीर,शुगर चेक अप,महिलांचे CBC चेकअप,ECG चेकअप चे आयोजन यावेळी करण्यात आले होते. तुम्ही जगा अन् इतरांनाही जगू द्या हे तत्त्व आमच्या समाजाचा मुळ पाया आहे.हा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.यामध्येच कल्याण आहे.केवळ मनुष्य जातच नाही तर किड्या, मुंग्या,किटक अशा शुक्ष्म जातींना देखील जगण्याचा तितकाच अधिकार आहे असे आमच्या समाजाचे तत्त्व आहे हे सर्वांनीच आत्मसात केले तर समाजातील सर्वच लोकांचे कल्याण होण्यास मदत होईल असेही जैन यावेळी म्हणाले.
उपाध्यक्ष प्रवीणकुमार जैन म्हणाले की भगवान महावीर यांचा कार्यकाळ सुमारे 2500 वर्षांपूर्वी सुरू होतो.वयाच्या 30 व्या वर्षी वैराग्य प्राप्त करून हे भगवान महावीर बनले.अहिंसेचे तत्त्व व तुम्ही जगा अन् इतरांनाही जगू द्या हे विचार सर्व समाजमनापुढे ठेवले त्यांच्या विचाराने उपस्थित सर्वच जातीचे ,धर्माचे कल्याण आहे.यासाठी आमच्या समाजामध्ये त्यांच्या तत्वांना प्रेरीत होऊन विचारांची जडणघडण समाजापुढे ठेवून कल्याणाचे कार्य कित्येक वर्षे सुरू आहे.

No comments:

Post a Comment