वेध माझा ऑनलाइन - कराड येथील दत्त चौकात असलेल्या शिवश्रुष्ठी संकुलवर चंदुकाका सराफ या सोन्याचांदीच्या दुकानची जाहिरात असते तिथे छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांच्याबाबतच्या ऐतिहासिक मजकुरासह त्यांचे या जाहिरातीत फोटोही लावण्यात यावेत या मागणीचे निवेदन येथील शिवप्रेमीच्या वतीने चंदुकाका सराफ याना आज देण्यात आले आहे हे फोटो येत्या 1 ते 16 मे या कालावधीत लावण्यात यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे
येथील दत्त चौक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यामागे शिवश्रुष्ठी संकुल आहे त्याच्या वरच्या मजल्यावर दर्शनी भागात म्हणजे रस्त्याकडे तोंड करून अनेक जाहिराती लावल्या जातात
त्याठिकाणी कायम स्वरूपी येथील चंदुकाका सराफ या सोनाचांदी दुकानच्या दागिन्यांची जाहिरात प्रदर्शित होत असते
इथून पुढे त्याठिकाणी शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक मजकूरासह व त्यांच्या ऐतिहासिक फोटोसह चंदुकाका सराफची जाहिरात लावली जावी या मागणीचे निवेदन चंदुकाका सराफ याना आज येथील शिवप्रेमीकडून देण्यात आले हे फोटो येत्या 1 ते 16 मे या कालावधीत लावण्यात यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे
यावेळी येथील चंदुकाका सराफ मॅनेजमेंटच्या वतीने या केलेल्या मागणीनुसार त्याठिकाणी ऐतिहासीक फोटो व मजकूर लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे
No comments:
Post a Comment