वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते हे दोन दिवसांपासून अटकेत आहेत. त्यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपली. त्यामुळे त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरात यांनी पोलिसांची बाजू मांडली. सरकारी वकिलांनी यावेळी सदावर्ते यांच्याबद्दल अनेक मोठमोठे गौप्यस्फोट केले. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केले गेले. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून प्रत्येकी 530 रुपये देणगी गोळा केली गेली. एकूण एक लाख कर्मचाऱ्यांनी पैसे दिले. त्यातून 1 कोटी 80 लाख रुपये गोळा करण्यात आले, असा धक्कादायक दावा सरकारी वकिलांनी केला आहे.
शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत 'सिल्व्हर ओक' येथे हल्ला करण्याचे ठरले होते. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले. त्यावेळी युट्यूब चॅनलचे देखील पत्रकार होते. याप्रकरणी आणखी चार जणांचा ताबा पाहिजे. तसेच एक जण फरार आहे.
MJT मराठी न्युज चॅनलचा चंद्रकांत सुर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडिओ डिलीट केले आहेत. या पत्रकाराचे आणि सदावर्ते यांचे सकाळी साडेदहा वाजेपासून व्हाट्सअॅप चॅट आहेत. या दोघांमध्ये व्हाट्सअॅप कॉल झाले. तर एक फोन नागपूर येथे करण्यात आला. तो फोन नेमका कुणाला करण्यात आला त्याचं नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाहीत.
काहीजण यामागे आहेत जे वेस्टेड कारणाकरता सपोर्ट करत आहेत. त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पैसे कुठून येतायेत याचा तपास करायचा आहे. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून 530 रुपये गोळा केले गेले. जवळपास 1 कोटी 80 लाख रुपये इतकी मोठी ती रक्कम आहे. या पैशांचे इतरही काही लाभार्थी आहेत. हे तपासात समोर आले आहे.
सदावर्ते यांचा एक फोन सापडत नाहीय. त्यात अनेक महत्वाच्या गोष्टी दडल्या आहेत. तो मोबाईल 31 मार्च 2022 पासून मिसिंग आहे. तो मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचे आहे. सदावर्ते हे नागपूर मध्ये कोणच्या तरी सतत संपर्कात होते. घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 मिनिटांनी फोन केला गेला होता. दुपारी 1.38 वाजता नागपूरच्या नंबरवर मॅसेज करुन सांगितले गेले की पत्रकार पाठवा. 12 एप्रिलला बारामतीत जायचे हा फक्त एक भ्रम तयार केला गेला होता. दुपारी 2.45 वाजता इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांना कळवलं गेलं. सदावर्ते मुद्दाम या घटनेच्या वेळेस कोर्टात गेले होते.
या प्रकरणी 4 नव्या जणांना अटक करण्यात आली आहे. तर एकजण फरार आहे. ताजुद्दीन शेख याने मॅसेज केले होते. 'सावधान शरद' नावाचा बॅनर बनवले गेले होते. या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहेत. आमदारांना 1 लाख पेन्शन आणि कामगारांना 1600 पेन्शन हा मॅसेज फिरवला गेला.
अभिषेक पाटील याने शरद पवारांच्या बंगल्याची रेकी केली. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक पाटील, कृष्णा कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, मंदाकिनी पवार या आरोपींना अटक केली. सच्चिदानंद पुरी यांचे देखील नाव तपासात समोर आले आहे. सदावर्तेंचा मोबाईल फोन शोधायचा आहे आणि १ कोटी ८० लाख रुपये कोणी कसे गोळा केले, ते पैसे कोणी कोणी वापरले याचा तपास करायचा आहे. या तपासासाठी कोर्टाने 11 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
No comments:
Post a Comment