Wednesday, April 20, 2022

राज्यात वीज टंचाई ; भारनियमन होणार!

वेध माझा ऑनलाइन - राज्यात वीज टंचाईमुळं भारनियमनाचं संकट गडद होत आहे. कोळसा टंचाईच्या समस्येमुळे महावितरण कंपन्यांवर मोठं संकट उभं ठाकलं आहे. वीजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जा विभागाला निर्देश दिले आहेत. विजेच्या समस्येबाबत उर्जा विभागाने दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी  लक्षात घेऊन ८ हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी उर्जा विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उर्जा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत त्यांनी राज्याची् सध्याची वीज निर्मिती, कोळशाचा साठा, वीजेची वाढती मागणी या समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत आढावा घेतला. या बैठकीला उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, माजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment