Tuesday, April 12, 2022

CBSE टर्म 2 ची परीक्षा येत्या 26 एप्रिल 2022 पासून होणार सुरू ; बोर्डाकडून नियमावली जारी

वेध माझा ऑनलाइन - कोरोनामुळे मागील वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी टर्म 1 ची परीक्षा घेण्यात अली होती. तर आता CBSE टर्म 2 ची परीक्षा येत्या 26 एप्रिल 2022 पासून सुरु होणार आहे. मात्र ही परीक्षा सुरु होण्याआधी विद्यार्थ्यांसाठी CBSE बोर्डाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.


लवकरच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट आणि रोल नंबर जारी केला जाईल. या आठवड्यात दहावी आणि बारावी परीक्षांचे रोल नंबर आणि हॉल तिकीट CBSE संलग्न शाळांना पाठवली जातील अशी अपेक्षा आहे. जेणेकरून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये त्याचे वाटप केले जाईल. तर खाजगी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जारी केले जाणार आहेत.

परीक्षेसाठीची नियमावली

परीक्षा हॉलमध्ये 12 ऐवजी 18 विद्यार्थ्यांना एका वर्गात बसण्याची परवानगी असेल.
सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आणि तापमान मोजण्यासारख्या सूचना पूर्वीप्रमाणेच याही परीक्षेत असणारा आहेत.
टर्म 2 प्रश्नपत्रिका कस्टोडियन्सना पाठवल्या जातील तसंच जिओ टॅगिंग आवश्यक असेल.
दहावी आणि बारावीची CBSE टर्म 2 परीक्षा दोन तासांची असेल.
सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना सकाळी 9.30 पर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल. तसेच विद्यार्थ्यांना 10.00 नंतर प्रवेश दिला जाणार नाही.
सकाळी 10:00 वाजता प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वितरित केल्या जातील. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 20 मिनिटे मिळणार आहेत.
परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दाखवावे लागेल. त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

बोर्डाने सर्व सीबीएसई संलग्न शाळांना नवीन सूचना पाठवल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वे मुळात कोविड-19 बद्दल आहेत. बोर्डाने कोविड-19 बाबत घेतलेली कठोरताही कमी केली आहे. तसंच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला बोर्डाकडून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment