वेध माझा ऑनलाइन - राज्यातील आगामी नगरपालिका निवडणूक या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील असा विश्वास आहे. दुर्दैवाने त्यात काही अपयश आले, तर मात्र स्वतंत्रपणे पक्ष निवडणूक लढवतील असे राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांनी आज दुपारी प्रीतिसंगम घाट येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले
ते म्हणाले ,कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आज कमकूवत असली तरी भविष्य काळामध्ये मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. येथील कट्टर कार्यकर्त्यांना चांगले बळ देऊन कराड दक्षिणेत राष्ट्रवादी मजबूत करू, असा विश्वास माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
खरतर राज्य करणाऱ्यांना विकास कामावर बोलण्याची आज गरज आहे. पण राज्यात सध्या आरे ला कारे करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या समाजाची टिंगल करते असं म्हणणं योग्य होणार नाही. पण दुर्दैवाने आज राजकारणाची पातळी घसरत असून ते हिताचे नाही.
किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक आज तेथील सभासदांना हातात घेतली असून त्यांना परिवर्तन हवे आहे. आपला ऊस गेला पाहिजे, त्याला भाव चांगला मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही नक्कीच परिवर्तन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment